शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मोदींनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे कान उपटावेत, रामदास कदम यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 11:50 IST

खेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या कामावर विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये शिवसेना किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी ...

खेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या कामावर विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये शिवसेना किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये सहभागी झाली आहे. आमचा विश्वासघात होणार नाही याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे. सगळ्याच जागांवर दावा करणाऱ्या महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे पंतप्रधान मोदी यांनी कान उपटायला हवेत, असा इशारा शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिला.

खेड तालुक्यातील जामगे येथे निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील भाजपवर तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर सणसणीत टीका केली. जेथे ज्या पक्षाचा खासदार आहे, ती जागा त्याच पक्षाला मिळायला हवी. अशा जागांवरही भाजपची मंडळी प्रयत्न करत आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, मावळ, संभाजीनगर या मतदारसंघात महाराष्ट्रातल्या भाजपकडून जे चालले आहे ते अतिशय घृणास्पद आहे. पंतप्रधान मोदी आणि शहा यांनी महाराष्ट्रातील काही भाजपा नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, असे ते म्हणाले.तुमच्यावर विश्वास ठेवून जे लोक आले आहेत, त्यांचा केसाने गळा कापू नका. यातून एक वेगळा संदेश जातोय, याचे भान भाजपच्या काही लोकांना नाही. दापोली मतदारसंघात आपल्या मुलाला बाजूला ठेवून भाजपचे लोक काम करत आहेत. याची दखल वरिष्ठ पातळीवर भाजपच्या मंडळीनी घेतली पाहिजे. मागच्या निवडणुकीत काय झाले मला माहीत नाही, पण पुन्हा पुन्हा आमचा विश्वासघात झाला तर, माझंही नाव रामदास कदम आहे, हे ध्यानात ठेवा,असा इशारा त्यांनी दिला.

जागेची मागणी कोणीही करू शकतो, पण मतदारसंघात कोणाचं वर्चस्व आहे ते पाहिले पाहिजे. सगळ्या ठिकाणी कमळच न्यायचे आणि इतर सगळ्यांना नेस्तनाबूत करायचं, असं चाललं आहे की काय, अशी शंका आपल्याला येत आहे. पण, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यामध्ये दखल देतील आणि असं होऊ देणार नाहीत, असा विश्वास आपल्याला असल्याचेही त्यांनी सांगितले.

राम मंदिर, ३७० कलम याचा उल्लेख करून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले. त्याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही केली. राम मंदिर व ३७० कलम हटवणे, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्ने ज्यांनी साकार केलं, त्यांच्याबद्दल उद्धव ठाकरे यांना आदर हवा होता. पण उद्धव ठाकरे आज काँग्रेसचे पाय चाटत आहेत. सकाळी उठल्यापासून त्यांना फक्त मोदी दिसतात.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRamdas Kadamरामदास कदमBJPभाजपा