शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Uday Samant: शिवसेनेचा त्रागा, सामंतांनी पकडला फक्त संयमाचा धागा; दिला सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 17:31 IST

आमदार उदय सामंत यांनी अजून कोणावरही टीका न करता संयमाची भूमिका घेतली

मनोज मुळ्येरत्नागिरी : राज्यात घडलेल्या राजकीय नाट्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेतही मोठी खळबळ उडाली. जिल्ह्यातील आमदार उदय सामंत आणि आमदार योगेश कदम यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेचे दोन भाग होणे अटळ झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून सातत्याने त्रागाच केला जात आहे. मात्र आमदार उदय सामंत यांनी अजून कोणावरही टीका न करता संयमाची भूमिका घेतली आहे. त्याचवेळी योग्य वेळी उत्तर देण्याचा सूचक इशाराही दिला आहे.शिंदे गटात सहभागी झालेल्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये पहिल्या दिवशी रत्नागिरीतील कोणाचाही समावेश नव्हता. मात्र प्रथम योगेश कदम आणि नंतर उदय सामंत यांनी त्या गटात प्रवेश केला. योगेश कदम यांची समस्या वेगळीच आहे. तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ते आधीपासूनच शिवसेनेतून बाजूला फेकले गेले होते. त्यामुळे ते शिंदे गटात जाण्याची शक्यता शिवसेना नेत्यांनाही होती. त्यामुळे  त्यांच्या जाण्यावर शिवसेनेकडून तितकीशी टीका झाली नाही.शिवसेनेच्या नेत्यांनी विशेषत: खासदार विनायक राऊत यांनी आमदार उदय सामंत यांनाच प्रमुख लक्ष्य केले आहे. उपरा, बाटगा अशी अनेक विशेषणे त्यांनी सामंत यांच्याबाबत वापरली आहेत. सामंत यांची राजकीय ताकद, त्यांची क्षमता, त्यांची कार्यपद्धती या साऱ्याची खासदार राऊत यांना कल्पना आहे. त्यामुळे सामंत यांच्या बाजूने जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे. म्हणूनच शिवसेनेकडून सामंत यांना विशेष लक्ष केले जात आहे. या टीकेमुळे त्यांच्याजवळ जाऊ शकणारे पदाधिकारी व कार्यकर्ते अडवण्याचा उद्देश बाळगून ही टीका केली जात आहे.तीव्र शब्दांत टीका होत असली तरी अजूनही आमदार उदय सामंत यांनी शिवसेनेवर किंवा खासदार विनायक राऊत यांच्यावर एकदाही टीका केलेली नाही. त्यांनी अजूनही आपली सर्व वक्तव्ये संयम राखून व्यक्त केली आहेत.आताही आपली भूमिका मांडताना त्यांनी खासदार राऊत यांच्या शब्दांमुळे आपल्याला दु:ख झाल्याचे, वाईट वाटल्याचे, खंत वाटल्याचे म्हटले आहे. पण ते ज्येष्ठ नेते असल्यामुळे आपण त्यांच्यावर टीका करणार नाही, अशीच प्रतिक्रिया माध्यमांकडे व्यक्त केली आहे.

सामंत यांची मुत्सद्देगिरीउदय सामंत गेली अडीच वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्याविरोधात भाजपकडून आमदार नितेश राणे यांनी खूपदा टीका केली होती. मात्र त्याला टीकेने उत्तर न देण्याची राजकीय मुत्सद्देगिरी उदय सामंत यांनी सातत्याने दाखवली आहे. त्यामुळे मंत्रिपदाचा अडीच वर्षाच्या काळात त्यांनी कोणावरही टीका केल्याचे उदाहरण नाही.

निवडणुकीत मोठी मदत२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आमदार उदय सामंत यांनी खासदार विनायक राऊत यांना मोठी मदत केली होती. या मदतीमुळेच २०१४ च्या निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या ३६ टक्के मते मिळवणाऱ्या शिवसेनेला २०१९च्या निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या ५० टक्के मते मिळाली आहेत. त्यावेळी उदय सामंत घेतलेल्या पुढाकारामुळे शिवसेनेची मते वाढली. मात्र आपल्यावरील टीकेला उत्तर देताना ही बाबही सामंत यांनी पुढे आलेली नाही.

अनेकजण तळ्यात मळ्यातआमदार उदय सामंत यांनी अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी यांना उभे केले आहे. पुढच्या काळातही त्यांच्याकडे मंत्रिपद असेल. त्यामुळे त्यांच्यासोबत जायचे की पक्षात राहायचे, याबाबत अजूनही अनेकजण तळ्यात मळ्यात आहेत. हे राजकीय नाट्य घडल्यानंतर सामंत अजून रत्नागिरीत आलेले नाहीत. ते जेव्हा येतील, तेव्हा हे चित्र स्पष्ट होइल.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंत