आमदार राजन साळवी यांच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण; सुरक्षा रक्षक गंभीर जखमी

By अरुण आडिवरेकर | Updated: March 6, 2023 15:45 IST2023-03-06T15:44:04+5:302023-03-06T15:45:03+5:30

उध्दव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या सुरक्षा रक्षकाला अज्ञातांकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.

MLA Rajan Salvi's security guard beaten up | आमदार राजन साळवी यांच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण; सुरक्षा रक्षक गंभीर जखमी

आमदार राजन साळवी यांच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण; सुरक्षा रक्षक गंभीर जखमी

रत्नागिरी : उध्दव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या सुरक्षा रक्षकाला अज्ञातांकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या मारहाणीत सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुयोग सावंत असे सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. सुमित सावंत रत्नागिरी पोलिस दलात कार्यरत आहे. सध्या ते आमदार राजन साळवी यांचे सुरक्षारक्षक म्हणून तैनात आहेत. शनिवारी (दि. ४) रात्री माळनाका ते थिबापॅलेस दरम्यान जात असताना त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. सावंत यांना जबर मारहाण झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे असून रात्रीच्यावेळी हा प्रकार घडल्याने हल्लेखोर नेमके कोण होते याची माहिती मिळवणे कठीण बनले आहे.

सुयोग सावंत यांना गंभीर जखमी अवस्थेत शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. जेलनाका ते माळनाका व थिबापॅलेस दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. ही मारहाण वैयक्तिक कारणातून झाली की, कसे याबाबत आता पोलिस तपास सुरू आहे.

Web Title: MLA Rajan Salvi's security guard beaten up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.