शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आमदार राजन साळवींची दोन तास चौकशी; कार्यालयाबाहेर पडताच कार्यकर्त्यांचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 12:39 IST

अटकेचे आदेश निघाले आहेत : साळवी

रत्नागिरी : बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी त्यांना भावासह साेमवारी रत्नागिरीतील कार्यालयात चाैकशीसाठी हजर राहण्याची नाेटीस बजावण्यात आली हाेती. साेमवारी ते कार्यालयात हजर हाेण्यासाठी निघताच कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. तब्बल दाेन तास त्यांची चाैकशी करुन त्यांना साेडण्यात आले. ते कार्यालयाबाहेर पडताच कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेत जल्लाेष केला.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आमदार राजन साळवी यांची गेले वर्षभर बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी चाैकशी सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी (१८ जानेवारी) त्यांच्या रत्नागिरीतील बंगल्यासह सहा ठिकाणच्या मालमत्तेची झाडाझडती घेण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी त्यांना भावासह साेमवारी (२२ जानेवारी) रत्नागिरीतील कार्यालयात हजर राहण्याची नाेटीस बजावण्यात आली.

रत्नागिरीतील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात हजर हाेण्यापूर्वी आमदार साळवी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात दाखल झाले. आमदार साळवी चाैकशीसाठी कार्यालयात जाणार असल्याची माहिती मिळताच त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते व पदाधिकारीही खासदार राऊत यांच्या कार्यालयात जमा झाले. कार्यकर्त्यांची माेठी गर्दी कार्यालयाबाहेर जमा झाली हाेती. कार्यकर्त्यांसमवेतच आमदार साळवी आणि त्यांचे भाऊ दीपक प्रभाकर साळवी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दाखल झाले.कार्यकर्त्यांनी आमदार साळवी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. खासदार राऊत यांचे संपर्क कार्यालय ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय असा कार्यकर्त्यांनी जणू माेर्चाच काढला हाेता. कार्यालयाबाहेरही कार्यकर्त्यांनी जाेरदार घाेषणाबाजी करून या कारवाईचा निषेध केला. घोषणाबाजी होत असतानाच आमदार साळवी त्यांच्या दोन्ही भावांसह लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात दाखल झाले.आमदार साळवी आणि त्यांचे भाऊ दीपक साळवी व संजय साळवी यांची दाेन तास चाैकशी करण्यात आली. या चाैकशीत त्यांना मालमत्ता, व्यवसायासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर त्यांना काही कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत देत साेडण्यात आले. ते कार्यालयाबाहेर येताच कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत घाेषणाबाजी केली. तसेच जल्लाेष केला.

अटकेचे आदेश निघाले आहेत : राजन साळवीआमदार राजन साळवी यांनी घोषणाबाजी करत असलेल्या शिवसैनिकांना शांत व संयम राखण्याचे आवाहन केले. त्याचवेळी त्यांनी स्वत:सह पत्नी आणि मुलगा यांना अटक करण्यासाठीचे आदेश निघालेले आहेत. त्यासाठीच मला आणि माझ्या मोठ्या बंधूंना कार्यालयात बोलावण्यात आले आहे, असे स्पष्टपणे सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajan Salviराजन साळवीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग