शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना ठाकरे गटाच्या आमदाराची चक्क सत्ताधाऱ्यांकडून पाठराखण, चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 12:33 IST

हे प्रेम नव्या राजकारणाची नांदी आहे का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात पुढे येत आहे.

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांत रत्नागिरीच्याराजकारणात नकळत मोठे बदल होऊ लागले आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेकडून रिफायनरीच्या समर्थनाचा लढा एकट्यानेच लढणाऱ्या आमदार राजन साळवी यांना सत्ताधारी पक्षाकडून चांगला पाठिंबा दिला जात आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार साळवी यांच्यावरील हे प्रेम नव्या राजकारणाची नांदी आहे का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात पुढे येत आहे.शिंदे गटाने स्वतंत्र भूमिका घेतल्यानंतर राजापूरचे आमदार राजन साळवी हेही शिंदे गटात सहभागी हाेतील, असा अंदाज होता. मात्र, आमदार साळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतच राहण्याची भूमिका घेतली. त्याची दखल घेत पक्षाने त्यांना उपनेतेपद दिले. त्यामुळे जिल्ह्याची पक्षाची सूत्रे त्यांच्याकडे सोपवली जातील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, काही दिवसांतच पक्षाने गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना शिवसेनेचे नेतेपद दिले. त्यावरून साळवी यांच्या समर्थकांमध्ये काहीशी नाराजी पसरली होती.शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आमदार साळवी शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा अनेकदा रंगली. प्रत्येकवेळा आमदार साळवी यांनी त्याचा इन्कार केला. तरीही या चर्चा थांबलेल्या नाहीत. दरवेळी नव्या नव्या मुद्द्यांवरून याबाबतची चर्चा सुरूच आहे. गेल्या काही दिवसात ऊर्जामंत्री उदय सामंत यांनी त्यांची पाठराखण सुरू केल्यामुळे पुन्हा एकदा याबाबतची चर्चा सुरू झाली आहे.केसालाही धक्का लागू देणार नाहीआमदार राजन साळवी यांनी रिफायनरीच्या समर्थनाची भूमिका घेतली असल्याने प्रकल्प परिसरात साळवी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. या एकूणच पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री उदय सामंत यांनी खणखणीत भूमिका घेत आमदार साळवी यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असे ठणकावले आहे. याआधीही त्यांना सुरक्षा देण्यातही मंत्री सामंत यांनी पुढाकार घेतला होता.सामंजस्याचे राजकारण  मंत्री उदय सामंत यांनी गेल्या काही वर्षांत आपल्या कामाच्या पद्धतीत मोठा बदल केला आहे. त्यांनी कोणत्याही नेत्याविरोधात आक्रमक, प्रक्षोभक किंवा खालच्या थराचे वक्तव्य त्यांनी केलेले नाही. टोकाची टीका केलेल्या खासदारांनाही त्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. मात्र, आमदार साळवी यांच्याबाबत त्यांची भूमिका अधिकच मऊ असल्याचे गेल्या काही दिवसात प्रकर्षाने पुढे येत आहे. ते आमदार साळवी यांचे वारंवार कौतुक करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच रत्नागिरीच्या राजकारणात काही ना काही उलथापालथी होण्याची अपेक्षा केली जात आहे.मंत्रालयातील बैठकीत कौतुकरिफायनरीबाबत मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मंत्री उदय सामंत यांनी आमदार राजन साळवी यांनी घेतलेल्या भूमिकेचे खूप मोठ्या प्रमाणात कौतुक केले होते. आमदार साळवी यांनी मांडलेल्या मागण्यांना त्यांनी सरकारतर्फे तत्काळ हिरवा कंदिलही दाखवला. बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेतही त्यांनी आमदार साळवी यांचे विशेष कौतुक केले. त्यांनी केलेल्या या कौतुकामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेRajan Salviराजन साळवी