शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

आमदार राजन साळवींसह भावाला सोमवारी हजर राहण्याची नोटीस, रत्नागिरी एसीबी'ची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 13:02 IST

'अटक होईल असे वाटत होते'

रत्नागिरी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माझ्यासह पत्नी व मुलावर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर या विभागाने माझ्या भावाकडे मोर्चा वळवला असून, मला व भाऊ दीपक प्रभाकर साळवी यांना २२ जानेवारी राेजी दुपारी १२ वाजता कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे, अशी माहिती आमदार राजन साळवी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आराेपाखाली आमदार साळवी यांच्यासह पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर गुरुवारी अचानक सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक आमदार राजन साळवी यांच्या घरासह ७ ठिकाणी छापे टाकले. सायंकाळी ७ वाजेपर्यंत त्यांच्या घराची झाडाझडती सुरू होती. त्याचवेळी त्यांच्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लॉकरचीही तपासणी केली होती.

रत्नागिरीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक सुशांत चव्हाण यांनी शुक्रवारी आमदार साळवी यांच्या भावाला नोटीस बजावली आहे. याबाबत साळवी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मला व माझ्या भावाला कार्यालयात हजर राहण्यास सांगितल्याचे त्यांनी सांगितले. माझे संपूर्ण कुटुंब माझ्या पाठीशी आहे. आम्ही कोणताही निर्णय एकत्रित बसून घेतो. त्यामुळे कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी सांगितले.यापूर्वीही माझा भाऊ दीपक यांना रायगडला चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळीही ते चौकशीला सामोरे गेले होते. यापुढे माझा छोटा भाऊ संजय साळवी यालाही चौकशीसाठी बोलावू शकतात, असेही त्यांनी सांगितले. यापूर्वी राजापूर, लांजामध्ये छोटे-मोठ्या विकासकामांचे ठेके घेणाऱ्या ७० जणांनाही रायगड येथील लाचलुचपत विभागाने चौकशीसाठी बोलावले होते, असेही त्यांनी सांगितले.

अटक होईल असे वाटत होतेआपल्याला शुक्रवारी सकाळी अटक करतील असे वाटत होते; पण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक सुशांत चव्हाण यांनी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. त्यामध्ये आपल्यासह माझे बंधू दीपक साळवी यांनाही हजर राहण्यास सांगितल्याचे ते म्हणाले.

कुटुंबाला त्रास देण्यासाठी कारवाईआमदार साळवी यांच्या भावाला चौकशीला बोलावल्यावर त्यांनी आमच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठीच ही कारवाई सुरू केली आहे. मात्र, आम्ही न डगमगता या कारवाईला सामोरे जाणार आहोत, असे सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajan Salviराजन साळवीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग