शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

रमेशराव तुम्ही चिपळूणची हंडी फोडा, मी तुम्हाला खांद्यावर घेतो; भास्कर जाधवांकडून एकीचे स्पष्ट संकेत

By संदीप बांद्रे | Updated: September 8, 2023 15:28 IST

चिपळूण : तुम्ही उत्तम कबड्डीपटू आहात, पकड कशी आणि कधी घालायची हे तुम्हाला चांगले ज्ञात आहे. तुम्ही मजबूत पकड ...

चिपळूण : तुम्ही उत्तम कबड्डीपटू आहात, पकड कशी आणि कधी घालायची हे तुम्हाला चांगले ज्ञात आहे. तुम्ही मजबूत पकड घाला, मी तुमच्या बरोबर उभा राहतो आणि हो रमेशराव आता चिपळूणची हंडी तुम्हीच फोडा. मी तुम्हाला खांद्यावर घेतो, अशा शब्दात आमदार भास्कर जाधव यांनी माजी आमदार रमेश कदम बरोबर एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत दिले. आता हे विधान नेमके कशासाठी होते, याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत.येथे गुरुवारी सर्वत्र दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चिपळूणमध्ये देखील जल्लोषात दहीहंडी साजरी झाली. विशेषतः राजकीय पक्षाकडून शहरात बांधण्यात आलेल्या दहीहंड्या चांगल्याच गाजल्या आणि आकर्षणाचा विषय देखील ठरला होता. या दहीहंडी उत्सवात प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते एकमेकांना भेटत होते, काही ठिकाणी व्यासपीठ देखील गाजवत होते. परंतु येथे माजी आमदार रमेश कदम मित्र मंडळाने बांधलेली दहीहंडी वेगळ्याच कारणाने गाजली व त्याची मोठी चर्चा चिपळूणात सुरू झाली.काही दिवसांपूर्वी चिपळूणात मराठा मोर्चा निघाला होता. त्यावेळी रमेश कदम व भास्कर जाधव एकत्र आले होते. नुसते एकत्रच आले नाही तर आमदार जाधवांनी रमेश कदमांना मिठी मारत जोरदार घोषणा देखील दिल्या होत्या. अशातच रमेश कदम मित्र मंडळाकडून शहरात बांधण्यात आलेल्या दहीहंडीच्या व्यासपीठावर स्वतः आमदार जाधव पोहचले. रमेश कदमांना भेटले हितगुज झाली आणि थेट माईक हातात घेऊन आमदार जाधव आपल्या स्टाईलमध्ये व्यक्त झाले. जाधव म्हणाले की, रमेशराव तुम्ही उत्तम कबड्डीपटू आहात. तुम्हाला पकड कशी आणि कधी घालायची हे माहीत आहे. आताही तुम्ही मजबूत पकड घाला, मी तुमच्या बरोबर उभा राहतो आणि हो रमेशराव आता चिपळूणची हंडी देखील तुम्हीच फोडा, मी तुम्हाला खांद्यावर घेतो. जाधवांच्या या वाक्याला उपस्थितांकडून जोरदार दाद मिळाली. टाळ्या शिट्ट्या आणि घोषणांनी परिसर दणाणले. जाधवांनी आपल्या खुमासदार भाषणाने खळबळ उडवून दिली. त्यांनी आपल्या भाषणातून एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत दिलेच, परंतु त्याहीपेक्षा त्याचा राजकीय अर्थ काय, रमेश कदमांनी विधानसभा लढवावी, आपण त्यांना साथ देऊ की येणाऱ्या नगर परिषद निवडणुकांच्या दृष्टीकोनातून आमदार जाधवांचे ते विधान होते, याबाबत आता वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBhaskar Jadhavभास्कर जाधवRamesh Kadamरमेश कदमChiplunचिपळुण