शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आमदार भास्कर जाधव यांनी चालवली एसटी बस; चिपळूण एसटी आगारात नवीन ५ बसेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 17:56 IST

एसटी बस चालवून शहरातून फेरफटका मारला

चिपळूण : प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या एसटी महामंडळाकडून येथील आगाराला ५ नवीन एसटी बसेस देण्यात आल्या. आमदार शेखर निकम व आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते या नवीन गाड्यांचे लोकार्पण श्रीफळ वाढवून करण्यात आले. आमदार जाधव यांनी शहरात बस चालवून प्रवाशांसह स्थानिक नागरिकांचे या नवीन एसटी बसकडे लक्ष वेधून घेतले.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला १० नवीन बसेस पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे चिपळूण आगाराला ५ बसेस मिळाल्या आहेत. अजून ५ बसेस लवकरच दाखल होणार आहेत. बीएस ६ मॉडेलच्या या एसटी बसेस आकर्षक व तितक्याच दमदार आहेत. या पाचही बसेस चिपळूण आगारात दाखल झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी रांगोळी काढत व पेढे वाटून आनंद साजरा केला. यानंतर आमदार जाधव व निकम यांच्या हस्ते या गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार जाधव यांनी एसटी बस चालवून शहरातून फेरफटका मारला. यावेळी आमदार निकम हेही प्रवासी म्हणून बसमध्ये उपस्थित होते.यावेळी आमदार जाधव म्हणाले की, जिल्ह्यात ५५ नवीन बसेस दाखल झाल्या आहेत. इतर तालुक्यात याआधीच बसेस मिळाल्या. त्यानंतर आता चिपळूण आगारात ५ बसेस मिळाल्या आहेत. उर्वरित बसेस लवकरच दाखल होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आमदार निकम म्हणाले की, नवीन बसमधून चांगला प्रवास झाला. बसचे स्टेअरिंग आमदार जाधव यांच्या हाती असल्याने आम्ही बिनधास्त होतो. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, जयंद्रथ खताते, दादा साळवी, शौकत मुकादम, मिलिंद कापडी, उदय ओतारी, दशरथ दाभोळकर, मयुर खेतले, रमेश राणे, नीलेश कदम, बिलाल पालकर, आदिती देशपांडे, पूजा निकम, आगार व्यवस्थापक दीपक चव्हाण उपस्थित होते.