लोटे येथे लाखोंचा अवैध मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST2021-05-27T04:32:46+5:302021-05-27T04:32:46+5:30
खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीनजीक माळवाडी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत एका घरातून लाखो रुपये किमतीचा ...

लोटे येथे लाखोंचा अवैध मद्यसाठा जप्त
खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीनजीक माळवाडी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत एका घरातून लाखो रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वाय.एम. पवार विभागीय उपआयुक्त कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा प्रभारी अधीक्षक व्ही.व्ही. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली खेड
तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीनजीक लोटे माळवाडी येथे राहणारा निहार हेमंत वारणकर याच्या घरात छापा टाकण्यात आला. त्यात गोवा बनावटीचा अवैध पद्धतीने साठा केलेल्या विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत सुमारे १ लाख ६४ हजार ४०० रुपये एवढ्या किमतीचे २७ खोके जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये मालक निहार हेमंत वारणकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क खेड विभागाचे प्रभारी निरीक्षक शंकर जाधव तसेच निरीक्षक व्ही.व्ही. सकपाळ, सहायक दुय्यम निरीक्षक आर.बी. भालेकर, जवान ए.के. बर्वे यांनी भाग घेतला. अधिक तपास दुय्यम निरीक्षक विशाल सकपाळ करीत आहेत.