सैन्य भरती : ४०७ उमेदवारांची वैद्यकीय चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:30 IST2019-11-23T00:30:05+5:302019-11-23T00:30:35+5:30
रत्नागिरी : शहरात सध्या सैन्य भरतीच्या अनुषंगाने उमेदवारांची शारीरिक क्षमता, कागदपत्रांची छाननी आणि वैद्यकीय चाचणी घेतली जात आहे. गेल्या ...

रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे १७ नोव्हेंबरपासून विविध जिल्ह्यातील तरूणांसाठी सैन्यभरती प्रक्रिया सुरू आहे. यानिमित्ताने शहरात येणारे तरूण विविध ठिकाणी आश्रय घेत आहेत.
रत्नागिरी : शहरात सध्या सैन्य भरतीच्या अनुषंगाने उमेदवारांची शारीरिक क्षमता, कागदपत्रांची छाननी आणि वैद्यकीय चाचणी घेतली जात आहे. गेल्या पाच दिवसांत १,५७४ उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली आहे. शुक्रवारी भरती प्रक्रियेला सुटी देण्यात आली.
१७ नोव्हेंबरपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर विविध जिल्ह्यांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. १७ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड, लातूर, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांतून आॅनलाईन अर्ज केलेले उमेदवार या भरतीत सहभागी झाले होते. आतापर्यंत आलेल्या एकूण २३,१२२ उमेदवारांपैकी कागदपत्रांची योग्य पूर्तता करून धावण्याच्या प्रक्रियेत सहभागी झालेल्या १८,००८ उमेदवारांपैकी वैद्यकीय चाचणीसाठी २,०१० उमेदवार पात्र ठरले आहेत. दरदिवशी कागदपत्रांची तपासणी, शारीरिक चाचणी झाल्यानंतर यात पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची दुपारनंतर वैद्यकीय चाचणी घेण्यात येते. गेल्या पाच दिवसांत १,५७४ उमेदवारांची वैद्यकीय तपासणी पुर्ण झाली आहे. शुक्रवारी भरती प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती.
शनिवारी सांगलीतील चार तालुक्यांतील उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. यावेळी उर्वरित उमेदवारांची वैद्यकीय चाचणी होईल.
वैद्यकीय चाचणी
१७ नोव्हेंबरपासून दुपारनंतर पात्र उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेण्यात येते. १७ रोजी १७३, १८ रोजी २७९, १९ रोजी ३६६, २० रोजी ३४९ आणि २१ रोजी ४०७ अशा एकूण १५७४ उमेदवारांची आतापर्यंत वैद्यकीय चाचणी घेण्यात आली आहे.