शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जबरदस्तीने मिऱ्या येथे एमआयडीसी लादणार नाही, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 18:18 IST

लाेकांना माझ्याविराेधात कितीही भडकवा; पण..

रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये उद्योग आणावा यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. येथील जनतेला रोजगार मिळावा, युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी तुमचा पालकमंत्री प्रयत्न करत आहे. ज्या ज्या ठिकाणी प्रकल्प आणण्याचे काम केले, जिथे एमआयडीसीची अधिसूचना निघाली आणि तिकडे विरोध झाला. पण स्थानिकांना रोजगार नको, प्रकल्प नको तर कोणावरही जबरदस्ती करून एमआयडीसी लादली जाणार नाही, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले.टाटा टेक्नाॅलाॅजीस व महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथे काैशल्यवर्धन केंद्राच्या उभारणीचे भूमिपूजन उद्याेगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी रत्नागिरी शहरातील मिऱ्या येथील एमआयडीसी उभारणीवरून सुरू झालेल्या विराेधावर भाष्य केले. भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी एमआयडीसीला विराेध केला असून, अधिसूचना रद्द करण्याची मागणी केली आहे. हाच मुद्दा धरून मंत्री सामंत यांनी जाेर जबरदस्ती करून एमआयडीसी लादणार नसल्याचे स्पष्ट केले.ते पुढे म्हणाले, मिऱ्यावासीयांच्या भावना भडकवून राजकारण केले जात आहे. माझ्यावर आरोप केले जात आहेत. मात्र आज सांगतो, माझ्या २० वर्षांच्या कार्यकाळात कोणत्याच समाजावर, गावावर अन्याय किंवा जबरदस्ती करून कोणतेच काम केले नाही. सगळ्यांना बरोबर नेऊन काम करण्याचे प्रामाणिक काम उद्योगमंत्री म्हणून मी केले आहे. मात्र, नाहक माझी बदनामी करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. लाेकांना माझ्याविराेधात कितीही भडकवा; पण जोपर्यंत रत्नागिरीतील जनतेचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत तोपर्यंत मी कोणालाही घाबरत नाही, असे मंत्री सामंत यांनी ठणकावून सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतMIDCएमआयडीसी