शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

मंडणगडमध्ये हजार एकरमध्ये एमआयडीसी : राज्यमंत्री योगेश कदम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 11:32 IST

महापुरुषांना जाती, धर्माच्या दृष्टिकोनातून पाहू नये

मंडणगड : उद्याेगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून मंडणगड येथे लवकरच एक हजार एकरमध्ये एमआयडीसी उभी केली जाईल. पहिला टप्प्यात सहाशे एकर आणि दुसऱ्या टप्प्यात चारशे एकर भूसंपादन केले जाईल. या एमआयडीसीमुळे या तालुक्यात रोजगार निर्मिती होईल आणि मुंबईकडे होणारे स्थलांतर थांबेल, असे उद्गार गृह तसेच महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी काढले. हजारो लोकांना उपयुक्त ठरेल, असे काम करणे हीच आपली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली आहे, असेही ते म्हणाले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे (ता. मंडणगड) येथील जयंती समारंभात ते बोलत होते. पालकमंत्री आणि मी दोघेही नशीबवान आहोत. ही बाब राज्यात फिरताना अभिमानाने सांगत असतो. कारण, बाबासाहेबांचे मूळ गाव हे माझ्या मतदार संघात आणि पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यात आहे, असे ते म्हणाले.

समाजकल्याण सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी संविधानाच्या उद्देशिका देत राज्यमंत्री कदम यांचे स्वागत केले. यशोदा महिला बचत गट, अनिशा रमेश जाधव, प्रेरणा गायकवाड, राज वेताळ, बाळकृष्ण मेडेकर, श्रद्धा मर्चंडे या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना यावेळी राज्यमंत्री कदम यांच्या हस्ते धनादेशांचे वाटप करण्यात आले.भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळाचे सचिव नरेंद्र सकपाळ यांनी कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळाचे अध्यक्ष महेंद्र सकपाळ, सुरेश सकपाळ, दलितमित्र दादासाहेब मर्चंडे, प्रताप घोसाळकर, प्रातांधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, तहसीलदार अक्षय ढाकणे, दापोलीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, मंडणगड गटविकास अधिकारी विशाल जाधव, गटशिक्षणाधिकारी नंदलाल शिंदे, सरपंच दीपिका जाकल यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

महापुरुषांना जाती, धर्माच्या दृष्टिकोनातून पाहू नयेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे असे अनेक पैलू आहेत, ज्यावर आपण विचार करत नाही. त्यामुळे मनाला वेदना होतात. महापुरुषांना आपण जाती, धर्माच्या दृष्टिकोनातून बघतो, ही दुर्दैवी गोष्ट आहे. संविधानातील गोष्टी वाचून पाहिल्या तर, आपण जाती, धर्माच्या बंधनातून बाहेर पडू. जात, धर्म यापलिकडे माणुसकी आहे, हाच संदेश बाबासाहेबांनी दिला आहे. त्यावर पुढे जाऊया, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीYogesh Kadamयोगेश कदमMIDCएमआयडीसी