मेर्वीत बिबट्याचे पिल्लू घुसले घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 21:32 IST2019-06-27T21:31:52+5:302019-06-27T21:32:50+5:30
मेर्वी खर्डेवाडी येथे रात्रभर पडणाºया पावसाने पºयांना पाणी आल्याने बिबट्याचे पिल्लू व मादीची ताटातूट झाल्याने एका पिल्लाने आसरा घेण्याच्या इराद्याने एका घरात प्रवेश केल्याने

मेर्वीत बिबट्याचे पिल्लू घुसले घरात
पावस : मेर्वी खर्डेवाडी येथे रात्रभर पडणाºया पावसाने पºयांना पाणी आल्याने बिबट्याचे पिल्लू व मादीची ताटातूट झाल्याने एका पिल्लाने आसरा घेण्याच्या इराद्याने एका घरात प्रवेश केल्याने लोकांची धांदल उडाली होती. मात्र, प्राणीमित्र प्रदीप डिंगणकर व सिद्धेश पावसकर यांनी पिल्लाला ताब्यात घेतले आणि वन विभागाच्या ताब्यात दिले.
बुधवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास मेर्वी खर्डेवाडी येथील एका घरात बिबट्याचे पिल्लू घरात घुसल्याचे लक्षात येताच घरातील माणसांची धांदल उडाली. ही बाब वाºयासारखी पसरल्यावर सुमारे दीडशे लोकांनी पिल्लू पाहण्यास गर्दी केली. तातडीने प्राणीमित्र प्रदीप डिंगणकर व सिद्धेश पावसकर यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याच्या पिल्लाला ताब्यात घेतले आणि वन विभागाला कळविले.
तातडीने वनपाल रवी गुरव, वनरक्षक महादेव पाटील, कुबल यांनी घटनास्थळी भेट देऊन त्या पिल्लाला अज्ञातवासात सोडून दिले. परंतु विजेच्या प्रकाशाचा शोध घेत पिल्लू पुन्हा वस्तीत आले. या पिल्लाला सुरक्षित ठेवण्यात आले असून, रात्री जंगलात सुरक्षित ठिकाणी ठेवून मादीची वाट पाहणार असल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात आले. विभागीय वन अधिकारी सुर्वे, परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही सुरु आहे.