मंडणगडची मयूरी मालुसरे ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:33 IST2021-04-28T04:33:57+5:302021-04-28T04:33:57+5:30

मंडणगड : लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची अर्थशास्त्र विषयाची माजी विद्यार्थिनी मयूरी विलासराव मालुसरे ही अर्थशास्त्र ...

Mayuri Malusare of Mandangad passed the 'set' examination | मंडणगडची मयूरी मालुसरे ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण

मंडणगडची मयूरी मालुसरे ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण

मंडणगड : लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची अर्थशास्त्र विषयाची माजी विद्यार्थिनी मयूरी विलासराव मालुसरे ही अर्थशास्त्र या विषयांमध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण झाली. युजीसी, महाराष्ट्र शासन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यामार्फत डिसेंबर २०२० या महिन्यात राज्यस्तरीय सेट परीक्षा (स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट) घेण्यात आली होती. ही परीक्षा वरिष्ठ महाविद्यालयामध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य आहे.

महाविद्यालयातर्फे प्रभारी प्राचार्य डाॅ. सुभाष सावंत यांच्या हस्ते मयूरी मालुसरे हिचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डाॅ. वाल्मिक परहर, डाॅ. भरतकुमार सोलापूरे, डाॅ. अशाेक साळुंखे, डाॅ. धनपाल कांबळे, प्रा. सुरज बुलाखे, डाॅ. शैलेश भैसारे, प्रा. पुरुषाेत्तम पिलगुलवार, ग्रंथपाल दगडू जगताप उपस्थित होते. तिला या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ. वाल्मिक परहर व डाॅ. भरतकुमार सोलापूरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Mayuri Malusare of Mandangad passed the 'set' examination