कापसाळ कोविड विलगीकरण केंद्राला साहित्य भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:39 IST2021-06-09T04:39:47+5:302021-06-09T04:39:47+5:30
अडरे : चिपळूण तालुक्यातील कापसाळ ग्रामपंचायत कोविड विलगीकरण केंद्राला युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते यांनी भेट देली़ ...

कापसाळ कोविड विलगीकरण केंद्राला साहित्य भेट
अडरे : चिपळूण तालुक्यातील कापसाळ ग्रामपंचायत कोविड विलगीकरण केंद्राला युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते यांनी भेट देली़ यावेळी कोविड विलगीकरण केंद्राला बेडशिट कापसाळच्या सरपंच सुनील गोरीवले यांच्याकडे दिल्या.
यावेळी शिवसेना विभागप्रमुख राम डिगे, युवासेना उपतालुका प्रमुख संजय चांदे, कापसाळ उपसरपंच प्रकाश डिगे, धामणवणे ग्रामपंचायत सदस्य नितीन शिगवण, रवी डिगे उपस्थित होते़ उमेश खताते यांनी कापसाळ गावासाठी २५० लीटर फवारणी लिक्विड उपलब्ध करुन दिले़ तसेच अंगणवाडी सेविका यांनी काही समस्या मांडल्या़ यावर लवकरच खासदार विनायक राऊत, पालकमंत्री अनिल परब, आमदार भास्कर जाधव व माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्याकडून आपल्या समस्या मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन, असे युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते यांनी सांगितले.
------------------------
चिपळूण तालुक्यातील कापसाळ ग्रामपंचायत काेविड विलगीकरण केंद्राला युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते यांच्याकडून साहित्य भेट देण्यात आले़