देवरूख काेविड चाचणी केंद्राला साहित्य भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:31 IST2021-05-26T04:31:51+5:302021-05-26T04:31:51+5:30
देवरुख : देवरूखातील कोविड चाचणी केंद्रात रूग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन संगमेश्वर तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने याठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध ...

देवरूख काेविड चाचणी केंद्राला साहित्य भेट
देवरुख : देवरूखातील कोविड चाचणी केंद्रात रूग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन संगमेश्वर तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने याठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
देवरुख जुने तहसील कार्यालय येथे काेविड चाचणी केंद्र कार्यरत आहे. केंद्रातील गैरसाेयींकडे राष्ट्र सेविका समितीच्या नेहा जोशी यांनी आरोग्य प्रशासनाचे लक्ष वेधले हाेते़ तसेच भाजप तालुकाध्यक्ष यांच्याकडेही समस्या मांडली हाेती. भाजप तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी तालुका उपाध्यक्ष अभिजीत शेट्ये, देवरुखचे माजी उपनगराध्यक्ष सुशांत मुळ्ये यांना सोबत घेऊन तत्काळ सिंटेक्स पाणी टाकी, रुग्णांसाठी बसायला बाकडी व केंद्रामध्ये फॅन आणि विजेची तत्काळ व्यवस्था करण्यात आली. सर्व साहित्य ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ़ अमरीश आगाशे यांचेकडे दिले़ यासाठी श्रेयस वृद्धाश्रमाचे शशिकांत गानू, नेहा जोशी यांनीही सहकार्य केले़