शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

समाज माध्यमांमध्ये मराठीला झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 5:13 PM

मातृभाषा असणाऱ्याच्या संख्येनुसार जगातील दहावा आणि भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये चौथा क्रमांक मिळवलेली भाषा म्हणजे मराठी. त्यामुळे साहजिकच समाज माध्यमांमध्येही मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.

ठळक मुद्देसमाज माध्यमांमध्ये मराठीला झळाळीबोललेले लिहिले जाते

मनोज मुळ्ये रत्नागिरी : मातृभाषा असणाऱ्याच्या संख्येनुसार जगातील दहावा आणि भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये चौथा क्रमांक मिळवलेली भाषा म्हणजे मराठी. त्यामुळे साहजिकच समाज माध्यमांमध्येही मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.

गेल्या पाच-सात वर्षात विविध दूरसंचार कंपन्यांनी भाषेच्या या वापराचे प्रमाण लक्षात घेऊन संदेश पाठवण्यासाठीही मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आजच्या घडीला मराठीतून संदेश पाठवण्यासाठीच्या असंख्य प्रणाली भ्रमणध्वनीवर उपलब्ध आहेत.अलिकडच्या काळात सर्वाधिक वापर होत असलेली गोष्ट म्हणजे भ्रमणध्वनी. बोलण्यापेक्षा त्याचा वापर संदेशवहनासाठी अधिक होत आहे. भ्रमणध्वनीचा वापर सुरू झाला, तेव्हापासूनच संदेशवहनाला अधिक महत्त्व आले. त्यासाठी दूरसंचार कंपन्यांनी विविध योजना आणल्या. फक्त संदेश (एमएमएस) पाठवण्यासाठीच्या आकर्षक योजनांनी संदेशवहनाचे महत्त्व वाढले. नंतर व्हॉट्सअ‍ॅप दाखल झाल्यानंतर त्या माध्यमातून संदेश पाठवले जाऊ लागले.

सुरूवातीला इंग्रजी शब्द देवनागरी अर्थाने वापरले जाऊ लागले. पण संदेश वहनासाठी मातृभाषा उपलब्ध झाली तर त्याचा पर्यायाने इंटरनेटचा वापर अधिक वाढेल, याचा अंदाज आल्याने दूरसंचार कंपन्यांनी संदेशवहनासाठी इंग्रजीसोबत मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून दिले.या पर्यायाचा इतक्या मोठ्या प्रमाणात वापर झाला की, अनेक कंपन्यांनी, इतकेच नाही तर प्रणाली (अ‍ॅप्लिकेशन) तयार करणाऱ्यांनीही अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध करून दिले. त्यामुळेच आजच्या घडीला अ‍ॅन्ड्रॉईड प्रणालीमध्ये ३0पेक्षा अधिक मराठी टंकलेखनाच्या प्रणाली उपलब्ध आहेत. ह्यगुगल प्लेस्टोअरह्णवर मराठी कीबोर्ड (कळफलक) शोधताना असंख्य पर्याय येतात. त्याचा जितका वापर वाढत आहे, तितका आधुनिकपणा त्यात आणला जात आहे. अनेक जोडशब्दांची उपलब्धता होत आहे.आता त्यात इतका आधुनिकपणा आला आहे की, बोललेले शब्द आपोआप टंकलिखित करणाऱ्याही अनेक मराठी प्रणाली आहेत. या पद्धतीचे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने आता संदेशवहनासाठी मराठीचा अधिकाधिक वापर होत असल्याचेही पाहायला मिळते. मराठीचा वापर वाढल्यामुळे त्यात सुधारणाही तेवढ्याच होत आहेत.बोललेले लिहिले जातेसंदेशवहनात मराठीचा वापर वाढल्यामुळे आता त्यात प्रयोगही खूप होत आहेत. भ्रमणध्वनीवर बोटाने लिहिलेली अक्षरे टंकलिखित नमुन्यात तयार करण्याची प्रणालीही आता उपलब्ध झाली आहे. त्यासाठी टंकलेखन करावे लागत नाही. बोललेले शब्द उमटत जातात आणि संदेश तयार होतो.

टॅग्स :Marathi Bhasha Dinमराठी भाषा दिनRatnagiriरत्नागिरी