आकाश शिर्के -- रत्नागिरी--कधी कधी एखाद्याचे वैशिष्ट्यच त्याच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरते, समुद्री कासवांबाबतही सध्या तेच होत आहे. कासवाचे मांस माणसांबरोबरच काही प्राणीही चवीने खात असल्याने सध्या समुद्री कासवांची संख्या झपाट्याने घटू लागली आहे. या जाती नामशेष होण्याआधी त्यांचे जतन करण्यावर भर देण्याची वेळ आली आहे.समुद्री कासवे सुमारे १०० ते १२५ वर्षे जगतात. ती जास्तीत जास्त ७८ ते ११२ सेंटीमीटर इतकी वाढतात. लहान हिरवे कासव हे उभयहारी असून, मृदुकाय जेलीफिश व स्पाँजेस खातात. परंतु ही कासवे प्रौढावस्थेत गेल्यावर पूर्णपणे शाहाकारी होतात. आॅलिव्ह रिडले हे कासव मात्र मासांहारी आहे. त्याच्या आहारात मासे, कवचधारी प्राणी, मृदूकाय प्राणी, माशांची अंडी इत्यादींचा समावेश असतो.समुद्री कासवे अंडी घालण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावरील एकाच जागेची निवड करतात. त्याचठिकाणी अंडी घालून समुद्रात निघून जातात. या अंड्यांचे रक्षण करण्याची किंवा त्यातून पिल्ले बाहेर येईपर्यंत ती सांभाळण्याची तसदी कासवे घेत नाहीत. अंड्यातून बाहेर आलेली कासवाची पिल्ले समुद्राकडे जातात. त्याचवेळी ती मुंगूस, कोल्हे, कुत्रे, मोठे खेकडे, शार्कमासे यांची शिकार होतात. त्यामुळे समुद्रीकासवे निर्वंश होण्याच्या मार्गावर आहेत. एकीकडे कासवांचा वंश वाढत नाही आणि दुसरीकडे मोठ्या कासवांची मांसासाठी हत्या केली जाते. हे मांस चविष्ट असल्यामुळे त्याला मोठी मागणी असते आणि त्यामुळेच अशा कासवांची हत्या केली जाते. त्यामुळे त्यांचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे भारत तसेच इतर राष्ट्रांनी या दुर्मीळ व निर्वंश होत चाललेल्या समुद्री कासवांच्या हत्येवर निर्बंध आणणे गरजेचे आहे.भारतामध्ये मरिन टर्टल कन्झर्वेशन अॅक्शन (एमटीसीए), सोसायटी फॉर प्रीव्हेन्शन आॅफ क्रुअल्टी टू अॅनिमल्स, विशाखापट्टणम सोसायटी फॉॅर प्रीव्हेन्शन आॅफ क्रुअल्टी आॅफ अॅनिमल्स या संस्था तसेच रत्नागिरी जिल्ह्यात सह्याद्री निसर्गमित्र, चिपळूण ही संस्था कासव संवर्धनात विशेष कार्यरत आहे. निसर्गमित्र संस्थेतर्फे मंडणगड तालुक्यातील वेळास येथील ग्रामस्थांच्या मदतीने कासवांच्या सवंर्धनाचे काम केले जात आहे. केवळ संवर्धनच नाही, तर त्याबाबतची जागृती करण्यावरही या संस्थेने भर दिला आहे.मंडणगड, वेळास येथे जातीसमुद्री कासवे वाळूमध्ये अंडी घालतात. काही लोक ही अंडी खातात. या अंड्यांना बाजारातही मोठ्या प्रमाणात भाव मिळतो. कासवाची पिल्ले पौर्णिमेच्या दिवशी समुद्राचा दिशेने जातात. अनेकदा ही कासवे अंधारात समुद्रात जाण्याऐवजी रस्त्यावर येतात आणि गाडीखाली चिरडून त्यांचा मृत्यू होतो. मासेमारीच्या जाळ्यात अडकूनही या कासवांचा मृत्यू होतो. २००२ साली ओडिसामध्ये अनेक कासवांचा मृत्यू याच कारणामुळे झाला होता. कासवांच्या कवचाला मोठ्या प्रमाणात भाव मिळत असल्याने त्यासाठीही कासवाची हत्या होते. - डॉ. ए. यु. पागारकरमत्स्यालय, रत्नागिरी
समुद्री कासवांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर !
By admin | Updated: July 13, 2016 00:48 IST