रत्नागिरी : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवपदी बदली झाली असून, त्यांच्या जागी रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल यांची नियुक्ती झाली आहे. मंगळवारी (दि.७) सायंकाळी हे आदेश देण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी सिंह गेली चार वर्षे रत्नागिरीमध्ये कार्यरत आहेत. रत्नागिरीत आपल्या कारकिर्दीत त्यांनी पुरासारख्या नैसर्गिक आपत्ती काळात संयमाने परिस्थिती हाताळली आहे. आता त्यांची बदली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये झाली आहे.सिंह यांच्याजागी मनुज जिंदल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनुज जिंदल हे महाराष्ट्र केडरमधील २०१७ बॅचचे अधिकारी आहेत. उत्तरप्रदेशातील गाझियाबाद आणि डेहराडून येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यांनी अमेरिकेतील व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीमधून बी. कॉम. (फायनान्स) आणि एम. ए. (पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन) केले. तेथे काही काळ नोकरी केल्यानंतर भारतात परतून त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि त्यात त्यांनी देशात ५२ वा क्रमांक पटकावला.युट्यूब चॅनलद्वारे मार्गदर्शन केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते युट्यूब चॅनलद्वारे मार्गदर्शन करतात. त्यासाठी त्यांनी पुस्तकही लिहिले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचे मार्गदर्शक, अशीही त्यांची ओळख आहे.
मनुज जिंदल रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 15:55 IST