मंडणगड-खेड रस्ता खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:30 IST2021-05-24T04:30:13+5:302021-05-24T04:30:13+5:30

मंडणगड : मंडणगड - खेड रस्त्यावर केळवत, पालघर, कुंबळे व दुधेरे या गावांच्या हद्दीत खड्डेच खड्डे पडले आहेत. सार्वजनिक ...

Mandangad-Khed road is rocky | मंडणगड-खेड रस्ता खड्डेमय

मंडणगड-खेड रस्ता खड्डेमय

मंडणगड : मंडणगड - खेड रस्त्यावर केळवत, पालघर, कुंबळे व दुधेरे या गावांच्या हद्दीत खड्डेच खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. गेल्या पावसातच मंडणगड - खेड मार्गावरील दहागावपर्यंतचा ११ कि. मी.चा रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला आहे.

स्थानिक नागरिकांना प्राधान्य द्या

चिपळूण : कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने लसीकरण मोहिमेवर भर दिला आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण सुरु आहे. मात्र, ऑनलाईन नोंदणीमुळे स्थानिक लोकांवर अन्याय होत असून, ते लसीकरणापासून वंचित राहात आहेत. तरी लसीकरणात स्थानिकांना प्रथम प्राधान्य द्यावे, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश मोहिते यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना बांधावर बियाणे वाटप

दापोली : कृषी महाविद्यालय, दापोलीच्या विस्तार शिक्षण विभागातर्फे सडवे, साखळोली, वाकवली, मौजे दापोली, कारुळ, उधळे व कळंबणी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बियाण्याचे वाटप करण्यात आले. कोकण कारली, कोकण घोसाळी, काकडी, भेंडी, चिबुड आदि बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

शेतकऱ्यांमध्ये जनजागृती

खेड : शेतकऱ्यांना हळद लागवड करण्यामध्ये रुची निर्माण व्हावी म्हणून खेड पंचायत समिती सेस निधीतून कृषीसाठी निधी राखीव ठेवून अनुदानावर शेतकऱ्यांना बियाणे व खते देण्यात येणार आहे. याबाबत सभापती, गटविकास अधिकारी व पंचायत समितीचे कृषी अधिकारी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करीत नियोजनबध्द दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपसभापती जीवन आंब्रे यांनी दिली.

साहित्याचे मोठे नुकसान

मंडणगड : तालुक्यातील भिंगळोली ग्रामपंचायत इमारत दुरुस्तीचे काम सरपंचांनी ६ महिन्यापूर्वी टेंडर काढून ठेकेदारास दिले होते. ग्रामपंचायतीची इमारत केवळ खोलून ठेवल्याने साहित्य उघड्यावरच पडून आहे. उघड्या ग्रामपंचायतीच्या छतावर पाणी साठले. त्यामध्ये सर्व साहित्य भिजून मोठे नुकसान झालेले आहे. त्या ठेकेदाराकडून नुकसान भरपाई घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

पावसाळी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

खेड : कोरोनामुळे लॉकडाऊनचे निर्बंध असल्याने तालुक्यातील ग्रामस्थ, शेतकरी शेतीविषयक साहित्य खरेदी करण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करीत टप्प्याटप्प्याने खेडच्या बाजारपेठेत हजेरी लावत आहेत. महत्त्वाच्या साहित्याच्या खरेदीसाठी ग्रामीण भागातील ग्राहक सकाळी ८ ते ११ या वेळेत तालुक्याच्या बाजारपेठेत येत आहेत.

गावकऱ्यांची काळजी

गुहागर : कोरोनासारख्या संकटात आपल्या जीवाभावाच्या ग्रामस्थांच्या काळजीपोटी धोपाव्यातील मुंबईकर मंडळी धावून आली. गावाकडची मंडळी कोरोनापासून दूर राहावीत, यासाठी धोपावे ग्रामविकास मंडळाने विविध प्रकारचे साहित्य गावात पाठवून दिले. गावकरी आणि मुंबईकर यांची मध्यवर्ती समिती स्थापन करुन आवश्यक मदत मार्गदर्शनासाठी व्यासपीठ सुरू केले.

विद्युत साहित्याचा ओघ

रत्नागिरी : जिल्ह्यात वादळामुळे माेठ्या प्रमाणात झालेली मोडतोड पुन्हा एकदा उभी करण्यासाठी महावितरण कंपनीला सर्व बाजूने मदतीचा ओघ सुरु झाला आहे. जिल्ह्यातील चिपळूण, खेड आणि रत्नागिरी विभागात सुमारे १२३९ गावातील वीजपुरवठा बंद पडला होता. मागील चार दिवसांतच कंपनी कर्मचाऱ्यांनी कंत्राटी कामगार, स्थानिक ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी यांनी अथक प्रयत्न करुन वीज पुरवठा सुरळीत केला.

खेर्डीत लसीकरण उपकेंद्राची मागणी

चिपळूण : खेर्डी गावची लोकसंख्या पाहता अडरे प्राथमिक आरोग्य केंद्रात मागणीप्रमाणे लसीकरण होत नाही. त्यामुळे खेर्डीमध्ये लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर यांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे केली आहे. याची तत्काळ दखल घेऊ आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांशी

चर्चा केली आहे.

Web Title: Mandangad-Khed road is rocky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.