शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: मंडणगड आयटीआयचा सोलर कल्टीवेटर राज्यात दुसरा, मुख्यमंत्र्यांनीही केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 18:41 IST

मंडणगड : पुणे येथे झालेल्या इनोव्हेशन कॉम्पिटिशन डिपेक्स या महाराष्ट्र राज्य स्तरावरील तंत्रशोध स्पर्धेत मंडणगडच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने ...

मंडणगड : पुणे येथे झालेल्या इनोव्हेशन कॉम्पिटिशन डिपेक्स या महाराष्ट्र राज्य स्तरावरील तंत्रशोध स्पर्धेत मंडणगडच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने (आयटीआय) राज्यात दुसरा क्रमांक मिळवला. या प्रोजेक्टचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कौतुक केले आहे.ही तंत्रशोध स्पर्धा पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (सीओईपी) येथे दि. ३ ते ६ एप्रिल यादरम्यान झाली. स्पर्धेसाठी राज्यातून सुमारे ४५४ स्पर्धक (प्रोजेक्ट) सहभागी झाले होते. आयआयटी ते आयटीआय अशा वेगवेगळ्या शिक्षण स्तरातील इंजिनीअरिंग कॉलेज यात सहभागी झाले होते. रत्नागिरी जिल्हा स्तरावर रँकमध्ये असलेल्या मंडणगड आयटीआयचा सोलर ऑपरेटर कल्टीवेटर हा प्रकल्प या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकल्पाची आवर्जून दखल घेतली. या प्रोजेक्टचे मार्गदर्शक आयटीआयचे प्राध्यापक अमित तांबे व प्राध्यापक सिद्धेश चव्हाण यांनी छोट्या भाजीपाला करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता हा प्रोजेक्ट कसा उपयुक्त आहे, याचे सादरीकरण केले. हा प्रोजेक्ट ‘थिंक सोलर थिंक ग्रीन’ यावर आधारित आहे.या प्रोजेक्टमध्ये सारीपुत्र पवार, विनय गणवे, समीर मेढेकर व रोहन गुजर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. इलेक्ट्रिशियन आणि वेल्डर या दोन्ही विभागांच्या मेहनतीने हा प्रकल्प तयार करण्यात आला होता. वेल्डर विभागाचे प्राध्यापक अशोक पवार, रिजा मुजावर यांचेही यामध्ये योगदान होते. प्रोजेक्टकरिता आयएमसी ऑफ आयटीआय मंडणगडचे अध्यक्ष देवेंद्र गुप्ता, तसेच सचिव तथा प्राचार्य प्रीतम शेट्ये यांचे सहकार्य लाभले.मुंबई विभागाचे सहसंचालक नितीन निकम व मुंबई विभागाच्या  पाबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी सहभाग नोंदविला होता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीiti collegeआयटीआय कॉलेजPuneपुणे