कुंभाड ग्रामस्थांतर्फे महेंद्र भोसले यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:33 IST2021-04-02T04:33:34+5:302021-04-02T04:33:34+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क दस्तुरी : शिवसेनेचे नवनिर्वाचित तालुका संघटक महेंद्र भोसले यांचा कुंभाड ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. कुंभाड गावचे ...

Mahendra Bhosale felicitated by Kumbhad villagers | कुंभाड ग्रामस्थांतर्फे महेंद्र भोसले यांचा सत्कार

कुंभाड ग्रामस्थांतर्फे महेंद्र भोसले यांचा सत्कार

लाेकमत न्यूज नेटवर्क

दस्तुरी : शिवसेनेचे नवनिर्वाचित तालुका संघटक महेंद्र भोसले यांचा कुंभाड ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला.

कुंभाड गावचे सरपंच म्हणून दहा वर्षे, तर उपसरपंच म्हणून पाच वर्षे कार्यरत राहून गावच्या विकासाला त्यांनी प्राधान्य दिले होते. शिवसेनेच्या तालुका संघटकपदी निवड झाल्याने सरपंच वैशाली साळवी, उपसरपंच महेश भोसले, शाखाप्रमुख सुजित भोसले यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका सचिव सचिन धाडवे, माजी सभापती विजय कदम, उपशाखाप्रमुख दिनेश साळवी, हनुमान क्रीडा मंडळांचे अध्यक्ष नरेंद्र भोसले, अस्तान गण संपर्कप्रमुख महेश मोरे, ज्येष्ठ नागरिक विजय भोसले, राजेंद्र भोसले, अमोल कदम, बजरंग साळवी व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन शरद भोसले यांनी केले.

Web Title: Mahendra Bhosale felicitated by Kumbhad villagers