शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

चिपळूणच्या वाढीव उड्डाणपुलासाठी मंत्र्यांना साकडे, महायुतीच्या शिष्टमंडळाची आग्रही मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 16:28 IST

मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपूल कापसाळपर्यंत होण्यासाठी हे शिष्टमंडळ पाठपुरावा करत आहे

चिपळूण : शहरातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाणपूल कापसाळपर्यंत वाढवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत आमदार शेखर निकम व महायुती शिष्टमंडळाची मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत कापसाळपर्यंत होणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना मंत्री भोसले यांनी दिल्या. तसेच चिपळुणात भेट देऊन महामार्गाची पाहणी करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपूल कापसाळपर्यंत होण्यासाठी हे शिष्टमंडळ पाठपुरावा करत आहे. आमदार निकम यांच्या पुढाकारामुळे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मंत्रालयातील दालनात सोमवारी शिष्टमंडळाची बैठक झाली. बैठकीत कापसाळपर्यंत उड्डाणपुलाची आवश्यकता सविस्तरपणे मांडण्यात आली.

त्यावर मंत्र्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ वाढीव उड्डाणपुलाच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना दिल्या. शिवाय मुख्य अभियंत्यांनाही येथे पाहणी करण्याची सूचना केली. येत्या काही दिवसांत चिपळूणला भेट देत स्वतः महामार्गाची पाहणी करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.

महामार्गावर सातत्याने होणारे अपघात, नागरिकांचे हाल, सामाजिक प्रश्न, ज्येष्ठांना व विद्यार्थ्यांना भयमुक्त करण्यासाठी आवश्यक ठिकाणी गतिरोधक, पाग नाका येथे सिग्नल व्यवस्था, कायमस्वरुपी पोलिस बंदोबस्त, पागनाका येथे फ्लाय फूट ब्रीज करण्याची मागणी केली. सदरची कामे तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्री भोसले यांनी दिले. त्यानुसार राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता शेलार यांना सदरची कामे मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. वाढीव उड्डाणपुलाचे अंदाजपत्रक केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल. त्याच्या मंजुरीसाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.या बैठकीला शिंदेसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ, भाजप शहराध्यक्ष शशिकांत मोदी, किशोर रेडीज, महायुती समन्वयक उदय ओतारी, दीपा देवळेकर, निहार कोवळे, सुयोग चव्हाण, विनोद पिल्ले, निनाद आवटे, अमित चिपळूणकर, विनायक वरवडेकर, कुणाल आंबेकर उपस्थित होते.