शहरं
Join us  
Trending Stories
1
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
2
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
3
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
4
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
5
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
6
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
7
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
8
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
9
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
10
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
11
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
12
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
13
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
14
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
15
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
16
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
17
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
18
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
19
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
20
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार

त्रिकुटामुळे महाराष्ट्र गुजरातपुढे नतमस्तक, जयंत पाटील यांचे टीकास्त्र

By संदीप बांद्रे | Updated: November 8, 2024 17:31 IST

मोदींच्या खोट्या योजनांनी जनतेला फसवले

चिपळूण : महाराष्ट्रातले १७ मोठे प्रकल्प गुजरातमध्ये  गेले, अनेक महत्वाचे कार्यालये स्थलांतरित केली. लाखो तरुणांचा रोजगार पळवला, तरी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे त्रिकुट एक शब्द देखील काढायला तयार नाही. मोदी आणि शहा समोर ते नतमस्तक झाले आहेत. महाराष्ट्र गुजरातला आंदण दिला आहे. त्यातून महाराष्ट्राची अधोगती सुरु झाली आहे. दरडोई उत्पन्नातही घसरले आहे. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. प्रत्येक पातळीवर सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे महायुती सरकारचे वाभाडे काढत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्याचे आवाहन केले.चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारार्थ चिपळूण शहरातील इंदिरा गांधी संस्कृतीक केंद्रासमोरील मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संबोधित करण्यासाठी माजी मंत्री राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. सभेत जयंत पाटील यांनी पक्षफुटी तसेच भाजपवर जोरदार निशाणा साधला.ते म्हणाले की, आधी ज्यांनी घोटाळे केले तेच आज भाजप बरोबर सरकारमध्ये मंत्री बनले आहेत. नवाब मलिक यांच्यावर चक्क देशद्रोहाचे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. तेच नवाब मलिक आज भाजप महायुतीचे उमेदवार आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्या मुलीला देखील महायुतीने उमेदवारी दिली आहे. एकवर एक फ्री योजना सुरू आहे. म्हणजेच खोटेनाटे आरोप करायचे, जेलमध्ये टाकायचे, नंतर त्यांना बाहेर काढून आपल्या पक्षाकडे घ्यायचे ही भाजपचे सत्तेचे समीकरण राहिले आहे, असा थेट आरोप जयंत पाटील यांनी केला. छगन भुजबळ यांच्या एका मुलाखतीचा दाखला देत जयंत पाटील म्हणाले छगन भुजबळ स्वतः म्हणालेत की, आम्हाला भाजप बरोबर जावे लागले. जर गेलो नसतो, तर आमच्यावर ईडी, इन्कमटॅक्स असे विविध कारवाई झाली असती आणि जेलमध्ये बसावे लागले असते. पुन्हा जेलमध्ये जाण्याची भीती वाटत होती. तेव्हा या कारवाया टाळण्यासाठी आम्हाला जावे लागले. जे जे भाजप बरोबर गेले त्यांच्यावर कारवाई होणार होती. त्याभीती पोटी ते लोक चक्क भापला शरण गेले, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.महागाई, बेरोजगारीने उच्चांक गाठला मी राज्याचा अर्थमंत्री असताना महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न देशाच्या तुलनेत १५ टक्के होते. आता ते १३ टक्क्यांवर आले आहे. दोन टक्के दरडोई उत्पन्न घटने म्हणजे लाखों कोटी रुपये उत्पन्न घटले आहे. जे स्वतः महाराष्ट्राचे उत्पन्न होते त्यामध्ये झालेली घट ही गंभीर आहे. महागाई आणि बेरोजगारीने तर महाराष्ट्रात उच्चांक गाठला आहे. महिला अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. महाराष्ट्र अधोगतीकडे चालला आहे. तरी देखील सरकार ढिम्म आहे, असा थेट आरोप देखील यावेळी जयंत पाटील यांनी केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chiplun-acचिपळूणJayant Patilजयंत पाटीलMahayutiमहायुतीGujaratगुजरातthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024