शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

रत्नागिरीत पाण्यातील वासराला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 18:17 IST

सकाळच्या वेळी पाणी पिण्यासाठी आलेले वासरू पाय घसरून कारंजाच्या पाण्यात पडल्याची घटना आज (सोमवारी) सकाळी ७ वाजण्याच्या सुमाराला रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर येथे घडली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरींनी तातडीने त्याला पाण्याबाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला.

ठळक मुद्दे वासरू पाय घसरून मारूती मंदिर येथील कारंजामध्ये पडले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरींनी पाण्याबाहेर काढल्याने अनर्थ टळला

अरूण आडिवरेकररत्नागिरी , दि. १६ :    सकाळच्या वेळी पाणी पिण्यासाठी आलेले वासरू पाय घसरून कारंजाच्या पाण्यात पडल्याची घटना आज (सोमवारी) सकाळी ७ वाजण्याच्या सुमाराला रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर येथे घडली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरींनी तातडीने त्याला पाण्याबाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला.मारूती मंदिर येथील शिवपुतळ्याची दररोज सकाळी ७ वाजता नित्य पूजा केली जाते. या पूजेसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी महेश पाडावे, प्रसाद सावंत, देवेंद्र झापडेकर, समीर सावंत यांच्यासह इतर उपस्थित होते. त्याचवेळी मोकाट जनावरे त्याचठिकाणी असलेल्या कारंजाजवळ पाणी पिण्यासाठी आली. त्यातील एक वासरू दोन्ही पाय वर ठेवून पाणी पिण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी त्याचे पाय घसरले आणि ते पाण्यात पडले.

पाण्यात पडलेल्या वासराने पुन्हा वर येण्यासाठी धडपड सुरू केली. पण, त्याला पुन्हा वर येता नसल्याने ते पाण्यात बुचकळू लागले.हा सारा प्रकार श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यानी पाहिली. त्यांनी तातडीने तिथे धाव घेऊन वासराला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

अथक प्रयत्नानंतर त्या वासराला पाण्यातून बाहेर काढण्यात यश मिळविले. त्यामुळे त्या वासराला जीवदान मिळाले. पाण्यासाठी या परिसरात वारंवार जनावरे येत असतात त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

 

टॅग्स :konkanकोकणWaterपाणी