जेव्हा चिमुकलीचं डोकं भिंतींमध्ये अडकतं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 05:33 PM2017-10-16T17:33:19+5:302017-10-16T19:45:02+5:30

मधल्या सुट्टीत खेळत असताना चुकून तिचं डोकं या दोन भिंतीच्या मध्ये अडकलं होतं. काळजीने व्याकूळ झालेल्या आईने तिला तिकडून बाहेर काढायचे खूप प्रयत्न केले.

When the girl's head caught in the walls | जेव्हा चिमुकलीचं डोकं भिंतींमध्ये अडकतं

जेव्हा चिमुकलीचं डोकं भिंतींमध्ये अडकतं

Next
ठळक मुद्देमधल्या सुट्टीत खेळत असताना चुकून तिचं डोकं या दोन भिंतीच्या मध्ये अडकलं होतं.बऱ्याच वेळाने त्या मुलीला सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं. सुदैवाने तिला कसलीच जखम झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

चीनमधल्या एका शाळेत दोन भितींमध्ये एका सहा वर्षांच्या मुलीचं डोकं अडकल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली. दोन भिंतीमध्ये डोकं अडकल्याने ती घाबरुन रडु लागली. तिच्या रडण्याचा आवाज तिच्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांना आला. त्यामुळे लगेच फायर क्र्यूला पाचारण करण्यात आले.

या दोन्ही भिंती एकमेंकापासून फार जवळ होत्या. त्यामुळे त्या मुलीचं डोकं त्यात अडकून राहिलं. अडकल्यानंतर त्या चिमुकलीला डोकं बाहेर काढण्यासाठी जागाच मिळत  नव्हती. तिचं संपूर्ण शरीर बाहेर होतं पण डोकं अडकल्याने तिला श्वासोच्छवासातही त्रास होत होता. दरम्यना तिच्या आईने हलक्या हाताने तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण तरीही तिचं डोकं काही बाहेर येईना. शेवटी फाईरफायटरने दोन भितींपैकी एक भिंत कापण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यामुळे चिमुकलीच्या जीवाला धोका होता.

फायरफाईटर चुकून जरी तिच्या डोक्याला लागला असता तरी तिचा जागीच जीव गेला असता. त्यामुळे त्यांनी तोही प्रयत्न थांबवला. अखेर त्यांनी अॅब्रेसिव्ह कागदाचा वापर करायचं ठरवलं. हा कागद भिंतीला घासला जातो. ज्यामुळे भिंतीची झीज होते. शिवाय त्यानंतर त्यांनी ल्युब्रिकेटींग तेल त्या भिंतीला लावल्याने त्या चिमुकलीचं डोकं बाहेर काढण्यात यश आलं.

मधल्या सुट्टीत खेळत असताना चुकून तिचं डोकं या दोन भिंतीच्या मध्ये अडकलं होतं. बरेच प्रयत्न केल्यानंतरही तिचं डोकं बाहेर येईना तेव्हा अॅब्रिसिव्ह कागदाचा वापर केला. बऱ्याच वेळाने त्या मुलीला सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं. सुदैवाने तिला कसलीच जखम झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: When the girl's head caught in the walls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.