चिपळूण शिक्षक संघातर्फे साहित्याची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:31 IST2021-05-26T04:31:42+5:302021-05-26T04:31:42+5:30
अडरे : काेराेनाच्या काळात सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनाही या कार्यात सहभागी आहे. त्याचाच एक भाग ...

चिपळूण शिक्षक संघातर्फे साहित्याची भेट
अडरे : काेराेनाच्या काळात
सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनाही या कार्यात सहभागी आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षक संघ चिपळूणच्या पुढाकाराने विस्टऑन व रिअल लाईफ रिअल पीपल या पुण्यातील संस्थांकडून प्राप्त झालेले पीपीई किट्स, ऑक्सिमीटर, थर्मल गन, सॅनिटायझर, मास्क, औषधे इ. सुमारे तीन लाख रुपयांचे साहित्य तालुका आरोग्य यंत्रणेकडे सुपूर्द करून खारीचा वाटा उचलला आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तालुकाध्यक्ष प्रकाश गांधी यांनी आमदार निकम करीत असलेले अलौकिक कार्य आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व प्रशासन घटक यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून ही मदत दिल्याचे सांगितले. आरोग्य यंत्रणेच्या नियोजनाप्रमाणे हे साहित्य तालुक्यातील कोविड सेंटर्स तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरित करण्यात येणार आहे. आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत तालुका आरोग्य अधिकारी ज्योती यादव यांच्याकडे साहित्य देण्यात आले. यावेळी चिपळूण पंचायत समिती सभापती रिया कांबळे, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, गटशिक्षणाधिकारी डी. डी. ईरनाक, संघटनेचे नेते विलास गुजर, जिल्हा सरचिटणीस दीपक मोने उपस्थित होते. तालुका सचिव. विनायक गुरव, फिरोज खान, बळीराम पाणिंद्रे, कृष्णदास डिके, कृष्णाजी कोकमकर, राम रहाटे, संभाजी चव्हाण, तुळशीराम धापसे, दीपक खाडे, सुनील उभळेकर, विश्वास पाटगावकर, किरण गोखले, देवराव शिसोदे, युगेश कदम, दिनेश लांजेकर, अशोक गोरिवले, विजय शिंदे, दीपक कांबळे या शिक्षकांनी योगदान दिले आहे.