शहरं
Join us  
Trending Stories
1
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
2
"सांसें उधार हैं... दिल तो महाकाल का है"; भस्म आरतीआधी भक्ताला हार्ट अटॅक, स्टेटसची चर्चा
3
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
4
समोश्यावरून वाद सुरू झाला अन् तलवारीच बाहेर निघाल्या! शेतकऱ्याच्या मृत्यूने परिसर हादरला
5
Video : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या केरळ दौऱ्यादरम्यान अपघात; हेलिकॉप्टर उतरताच हेलिपॅड खचले, थोडक्यात टळली दुर्घटना 
6
७ राशींवर कायम लक्ष्मी-कुबेर कृपा, पैसे कमीच पडत नाही; शुभ तेच घडते, तुमची रास आहे का यात?
7
"समजलं तर ठीक, नाही तर...!", कॅनाडामध्ये पंजाबी सिंगर तेजी कहलोंवर गोळीबार; रोहित गोदारा गँगनं घेतली जबाबदारी
8
चित्रांगदा सिंह रुग्णालयात दाखल, ऐन दिवाळीत अभिनेत्रीची तब्येत बिघडली; नक्की झालं तरी काय?
9
प्रायव्हसी धोक्यात? 'Apple Maps' गुपचूप ट्रॅक करतंय तुमची प्रत्येक लोकेशन! लगेच बंद करा 'ही' सेटिंग
10
IND vs AUS : 'मी सचिनपेक्षाही अधिक धावा केल्या असत्या!' पण… ऑस्ट्रेलियन क्रिकेटरचा मोठा दावा
11
Happy Bhaubeej 2025 Wishes: भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या प्रेमळ नात्याच्या लडिवाळ शुभेच्छा!
12
लेडी सिंघम! १४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी २ मुलांची आई; स्वप्न केलं साकार, झाली IPS ऑफिसर
13
PPF vs FD: पीपीएफ की एफडी, कुठे गुंतवणूक केल्यावर मिळेल मोठा फायदा? कोणता पर्याय करुन देऊ शकते तुफान कमाई
14
Ladki Bahin Yojana : खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहि‍णींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?
15
'या' शेअरमध्ये १८ महिन्यांत ६३०००% ची तेजी; आता BSE नं वाजवली धोक्याची घंटा, क्रिकेटरचंही जोडलेलं नाव
16
Hardik Pandya Mahieka Sharma Look ... अन् पांड्याची 'हॉट अँण्ड बोल्ड' गर्लफ्रेंड झाली 'संस्कारी'
17
अवघ्या ५ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न, तरुणानं धावत्या ट्रेनसमोर मारली उडी! व्हिडीओत म्हणाला, "सगळ्यांनी ऐका, माझी बायको.."
18
Gold Silver Price Drop: सोन्या चांदीचे दर जोरदार आपटले; ४ वर्षातील सर्वात मोठी घसरण, काय आहे यामागचं कारण
19
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
20
का रे दुरावा? सुयश टिळक आणि आयुषी भावेच्या नात्यात बिनसलं, दिवाळीलाही एकत्र दिसलं नाही जोडपं

Ratnagiri: समुद्रात लाटांमध्ये अडकल्या, बुडू लागताच केला आरडाओरडा; जीवरक्षकांमुळे कोल्हापूरच्या तिघींचा वाचला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 11:56 IST

दोन महिलांसह युवतीचा समावेश

गणपतीपुळे (जि. रत्नागिरी) : समुद्रात अंघाेळ करताना लाटांमध्ये बुडणाऱ्या दाेन महिलांसह एका युवतीचा जीव वॉटर स्पोर्टस् व्यावसायिक आणि जीवरक्षकांनी प्रसंगावधान दाखवत वाचविला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास श्रीक्षेत्र गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथे घडली. तिन्ही महिला जोतिबा डोंगर वाडी रत्नागिरी (जि. कोल्हापूर) येथील आहेत.निशा अजय सांगळे (वय ३०), हर्षदा प्रमोद मिटके (वय ३०) आणि तनुजा रमेश आभाळे (वय १७) अशी तिघींची नावे आहेत. काेल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर वाडी रत्नागिरी येथून २३ जणांचा एक ग्रुप गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी गुरुवारी सायंकाळी मुक्कामासाठी आला हाेता. शुक्रवारी समुद्रामध्ये अंघोळ करून देवदर्शन उरकून हे सर्वजण परतीच्या प्रवासाला निघणार होते. शुक्रवारी सकाळी सर्वजण ग्रामपंचायतीच्या स्वच्छतागृह इमारतीच्या समोरील समुद्राच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरले हाेते. अंघाेळ करताना निशा सांगळे, हर्षदा मिटके यांच्यासह तनुजा आभाळे समुद्राच्या मोठ्या लाटांमध्ये अडकल्या. त्यांना समुद्रातून बाहेर पडता येत नव्हते.समुद्राच्या माेठ्या लाटांमुळे त्या बुडू लागताच त्यांनी आरडाओरडा सुरू केला. हा प्रकार लक्षात येताच समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या वॉटर स्पोर्ट व्यावसायिकांनी आपल्या स्पीड बोटीच्या साहाय्याने तत्काळ धाव घेतली आणि तिघींनाही पाण्याबाहेर काढले. तिघींनाही अधिक उपचारासाठी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पणकुटे यांनी सांगितले. त्यांना आवश्यक सूचना देऊन घरी सोडण्यात आले.

प्रसंगावधानामुळे वाचले प्राणवाॅटर स्पाेर्ट व्यावसायिक आणि जीवरक्षकांनी प्रसंगावधान दाखवून मदतकार्य केले. त्यामुळे समुद्रात बुडणाऱ्या तिघींनाही वाचविण्यात यश आले. दैव बलवत्तर म्हणून तिघींचे प्राण वाचले असून, माेठी दुर्घटना टळली. वाॅटर स्पाेर्ट व्यावसायिक आणि जीवरक्षकांच्या तत्परतेचे काैतुक करण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Lifeguards Save Three Kolhapur Women from Drowning in Sea

Web Summary : Lifeguards in Ganpatipule, Ratnagiri, rescued three women from Kolhapur who were drowning in the sea. Water sports professionals swiftly pulled them to safety after hearing their cries for help. They received first aid and are stable. A major accident was averted due to prompt action.