शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीचा खून करणाऱ्या प्रियकराला जन्मठेप, रत्नागिरीतील हातखंबा-तारवेवाडी येथील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 12:19 IST

ब्लॅकमेल करुन करत होती पैशाची मागणी. वादातून संतापून केला निर्घृण खून

रत्नागिरी : प्रेयसीच्या पाेटात सुरा भाेसकून तिचा खून केल्याप्रकरणी संताेष बबन सावंत याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही घटना हातखंबा -तारवेवाडी (ता. रत्नागिरी) १० जानेवारी २०१९ राेजी घडली असून, या प्रकरणाचा शुक्रवारी (११ ऑगस्ट) निकाल लागला.संतोष सावंत व पत्नी सोनाली सावंत हे दाम्पत्य दोन ते अडीच वर्षांपासून हातखंबा-तारवेवाडी येथे भाड्याच्या घरात राहत होते. संतोष हा ट्रक चालक होता तर पत्नी एका हॉटेलमध्ये कामाला होती. संतोषची ओळख ज्योती ऊर्फ शमिका पिलणकर हिच्याशी झाली होती. या मैत्रीतून दोघांमध्ये अनेकवेळा अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते आणि त्याचे फोटो शमिकाने काढून ठेवले होते.त्या फोटोची भीती दाखवून ती संतोष याला ब्लॅकमेल करत होती. कधी पाच हजार तर कधी दोन हजार अशी पैशाची मागणी करत हाेती. १० जानेवारी राेजी शमिका व संतोष यांच्यात पैशावरून वाद झाला. त्यावेळी संतापलेल्या संतोषने शमिकाच्या पोटात सुरा भोसकून तिचा निर्घृण खून केला. या प्रकारानंतर संतोष याने साक्षीदार सुहास नितोरे यांना फोन करून सायंकाळी ४:४५ वाजण्याच्या सुमारास पत्नी काम करत असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी बोलावून घेतले.हा खून केल्यानंतर संतोष हा रिक्षा घेऊन पत्नी काम करत असलेल्या हॉटेलवर आला. त्या ठिकाणी घडला प्रकार त्याने आपल्या पत्नीला सांगितला. पत्नीने घरी येऊन पाहिले असता या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना दिली होती. त्यानंतर तत्कालीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, तत्कालीन पोलिस निरीक्षक सुरेश कदम, तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस कर्मचारी चावरे, सुनील गायकवाड, अमित कदम, उमेश गायकवाड, प्रवीण पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.या प्रकरणी संतोष बबन सावंत याच्याविरोधात भारतीय दंड विधान कायदा कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यावर अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाने संतोष याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच १० हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास एक वर्षाचा साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून प्रफुल्ल रामचंद्र साळवी यांनी काम पाहिले तर कोर्ट पैरवी म्हणून सहायक पाेलिस निरीक्षक सुनील आयरे यांनी मदत केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय