शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

वाचनालये प्रबोधनाबरोबरच परिवर्तन घडवतात

By admin | Updated: October 25, 2015 23:31 IST

अरूण इंगवले : चिपळुणात माता रमाई आंबेडकर वाचनालयाचे उद्घाटन

चिपळूण : आजवरच्या जगभरातील सामाजिक व राजकीय क्रांती या पुस्तकांमुळेच झाल्या आहेत. विचारवंताच्या लेखनातून व त्यांच्या वाचनातूनच समाजाची जडणघडण होत असते. त्यातूनच समाज बदलासाठी किंंवा नव्या क्रांतीसाठी तयार होत असतो. त्यामुळे मानवी जीवनात वाचनालय व गं्रथालयाचे स्थान महत्वाचे आहे. कारण वाचनालये सामाजिक प्रबोधन व परिवर्तन घडवण्याचे काम करत असतात, असे प्रतिपादन चिपळुणातील ज्येष्ठ साहित्यिक अरूण इंगवले यांनी केले.चिपळूण तालुका बौध्दजन हितसंरक्षक समितीच्या ‘शिक्षण समिती’च्या वतीने संस्थेच्या चिपळुणातील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात ‘माता रमाई आंबेडकर वाचनालय, चिपळूण’ चे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी माता रमाई आंबेडकर वाचनालयाचे उद्घाटन व नामफलकाचे अनावरण ज्येष्ठ साहित्यिक अरूण इंगवले, ज्येष्ठ कादंबरीकार, साहित्यिक श्रीराम दुर्गे व संस्थेच्या मुंबई कमिटीचे उपाध्यक्ष रामदास गमरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे स्थानिक अध्यक्ष चंद्रकांत सावंत होते. यावेळी बुध्द धम्म प्रचार समिती, चेंबूर मुंबईचे केंद्रीय सदस्य राजू कदम, मुख्य कमिटी मुंबईचे उपाध्यक्ष रामदास गमरे, शिक्षण कमिटी मुंबई अध्यक्ष तथा संस्थेचे कार्याध्यक्ष विठोबा पवार, हिशेब तपासणीस आनंद जाधव, सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव, आनंद कदम, संस्थेचे सरचिटणीस अशोक कदम, शिक्षण कमिटीचे अध्यक्ष संदेश पवार, उपाध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, सुदेश गमरे, सुहास पवार, खजिनदार जगदीश कांबळे, हिशेब तपासनीस दिवाकर जाधव, रमाकांत सकपाळ, न. प. अधिकारी अनंत हळदे, दिलीप मोहिते, धम्म कमिटीचे अध्यक्ष अनंत पवार, संजय मोहिते उपस्थित होते. कार्याध्यक्ष विठोबा पवार यांनी विचार व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी संस्थेच्या व शिक्षण समितीच्या कामांचा आढावा घेतला. प्रास्ताविकात शिक्षण समितीचे अध्यक्ष संदेश पवार यांनी वाचनालय सुरू करण्यामागची भूमिका विषद करून अनेक दात्यांनी केलेल्या मदतीचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. तसेच याप्रसंगी सर्व देणगीदारांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला माजी गटशिक्षणाधिकारी सशाली मोहिते, अंजली कदम, भिमराव जाधव, उल्हास कदम, राजेश मोहिते, प्रवीण जाधव, मनोहर कदम, प्रकाश गमरे, शिवदास तांबे, नारायण जाधव, संजय जाधव, संतोष पवार, तुकाराम सकपाळ, प्रकाश कदम, मेजर दत्ताराम मोहिते, प्रभाकर सकपाळ, सीताराम कदम, एस. डी. गायकवाड, सुधीर मोहिते, मनोज पवार, प्रकाश पवार, विलास सकपाळ, गौतम जाधव, सुरेंद्र मोहिते, निर्मला कांबळे, अशोक सकपाळ आदी प्रमुख कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)वाचनानेच माणूस समृध्द होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रकांडपंडीत होते. त्यांनी अध्ययनाच्या व वाचनाच्या बळावरच सर्वोच्च स्थान पटकावले. त्यामुळे ते विश्ववंदनीय ठरले. आपणही रोज चांगले वाचन केले पाहिजे. कारण आपण ज्या वातावरणात राहतो, ते वातावरण वैचारिकदृष्ट्या गढूळ आहे. त्यामुळे अनेकदा आपल्यावर चुकीचे संस्कार होण्याचा धोका असतो. त्यामुळे आपण स्वत: वाचन केले, तरचं खरे काय? खोटे काय? ते कळू शकेल.वैचारिक वातावरण गढूळ.मानवी जीवनात वाचनालय, ग्रंथालयाचे स्थान महत्वाचे.चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीतर्फे कार्यक्रम.