शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’च्या ग्रामसभेस अधिकाऱ्यांची पाठ

By admin | Updated: November 19, 2015 00:44 IST

ग्रामसभेचा ठराव वरिष्ठांना कळवणार

चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायतीची जलयुक्त शिवार योजनेसाठीची विशेष ग्रामसभा कुटगिरी - येडगेवाडी येथे बुधवारी झाली. या ग्रामसभेकडे शासनाच्या खातेप्रमुखांनी पाठ फिरवल्याने नाराजी व्यक्त होत आहे. जलयुक्तसारख्या महत्त्वाच्या योजनेची कामे निवडण्यासाठी ग्रामसभा घेतली असताना पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागातील कोणतेही अधिकारी उपलब्ध होऊ शकले नाहीत. येडगेवाडी ही पाणीटंचाईग्रस्त वाडी असल्याने दरवर्षी या वाडीला पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरु करावा लागतो. एवढे गंभीर प्रश्न असूनही पाणीपुरवठा अथवा पंचायत समितीतील एकही जबाबदार अधिकारी हजर राहू शकला नाही. यावर्षी संगमेश्वर तालुक्यातील १५ गावे ही जलयुक्तमध्ये घेतली गेली आहेत. त्यापैकी ५ गावे अंमलबजावणीसाठी निवडली जाणार आहेत. यातून गंभीर पाणी समस्या असणाऱ्या अथवा शासन सिंचन उपलब्ध करून देण्यास आवश्यकता असणाऱ्या गावांचा प्रथमदर्शी समावेश होऊ शकतो. येडगेवाडीची पाण्याची टंचाई लक्षात घेता ही वाडी पाचपैकी प्रथम क्रमांकामध्ये बसेल, अशी स्थिती आहे. याचे निकष ठरविण्यासाठीच्या सभेला पाणीपुरवठा विभागच गायब होता. आजच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी कायमस्वरुपी पाणी समस्या सोडवण्यासाठी आम्हाला धरणातून पाणी उचलून द्यावे, त्यामुळे आमचा पाण्याचा प्रश्न निकाली निघेल तर उपस्थित असलेल्या महसूलच्या मंडल अधिकारी, कृषीचे सुस्तरफोड, तर ग्रामसेवक जाधव यांनी ग्रामसभेचा ठराव वरिष्ठ कार्यालयाला कळविला जाईल, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)