बिबट्याने हल्ला करून श्वान केला फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 17:31 IST2020-09-17T17:29:52+5:302020-09-17T17:31:23+5:30
वेरवली बुद्रुक येथील श्रीकृष्ण सरदेसाई यांचा पाळीव श्वान बिबट्याने हल्ला करून फस्त केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

बिबट्याने हल्ला करून श्वान केला फस्त
लांजा : वेरवली बुद्रुक येथील श्रीकृष्ण सरदेसाई यांचा पाळीव श्वान बिबट्याने हल्ला करून फस्त केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वेरवली बुद्रुक येथील श्रीकृष्ण नरहर सरदेसाई यांनी पाळलेला श्वान बुधवारी सकाळी कुठेही आढळला नाही. त्यांनी घराच्या आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. अखेर देसाई यांनी त्यांनी घराच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून पाहिले असता त्यांना धक्का बसला.
घराच्या अंगणात असलेल्या श्वानावर रात्री १० वाजता बिबट्याने झडप घालून येथून धूम ठोकल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिबट्या घरापर्यंत पोहोचल्याने गावात बिबट्याचा संचार असल्याने येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.