आबलाेली येथे शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:36 IST2021-07-14T04:36:39+5:302021-07-14T04:36:39+5:30
आबलाेली : शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार तालुक्यात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ पंचायत ...

आबलाेली येथे शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ
आबलाेली : शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार तालुक्यात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ पंचायत समिती पडवे गणात आबलोली गावापासून करण्यात आला. यावेळी आबलोली येथे सभापती यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, तसेच आबलोली परिसरात विविध विकास कामांचे भूमिपूजन-उद्घाटन सभापती पूर्वी निमुणकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, तसेच पंचायत समिती गुहागर येथे शिक्षण विभागासाठी संगणक संचाचे वाटप, एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत लाभार्थ्यांना बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले. आबलोली येथे एसटी वाहतूक नियंत्रक कक्षाचे उद्घाटन सभापती पूर्वी निमुणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख सचिन बाईत, उपसभापती सीताराम ठोंबरे, पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर, विनायक मुळ्ये, गटविकास अधिकारी अमोल भोसले, सहायक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, गटशिक्षणाधिकारी वामन जगदाळे, आबलोली सरपंच तुकाराम पागडे, खोडदे सरपंच प्रदीप मोहिते, आबलोली शाखाप्रमुख संदीप निमुणकर, विभाग प्रमुख नरेश निमुणकर, वनिता डिंगणकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. नरेश निमुणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.