लांजा तालुक्यात ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ अभियानाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:51 IST2021-05-05T04:51:23+5:302021-05-05T04:51:23+5:30

लांजा : तालुक्यात ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ अभियानाचा शुभारंभ आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत मंगळवारी वेरळ येथून ...

Launch of 'My Ratnagiri, My Responsibility' campaign in Lanja taluka | लांजा तालुक्यात ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ अभियानाला सुरुवात

लांजा तालुक्यात ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ अभियानाला सुरुवात

लांजा : तालुक्यात ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ अभियानाचा शुभारंभ आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत मंगळवारी वेरळ येथून करण्यात आला.

कोरोनाचा प्रादुर्भाव रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढत असून, प्रत्येक गावामध्ये कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. लांजा तालुक्यातील देवधे जिल्हा परिषद गटातील वेरळ ग्रामपंचायत कार्यालयात ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, जिल्हा परिषद अर्थ आणि शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर, सभापती मानसी आंबेकर, उपसभापती दीपाली दळवी, गटविकास अधिकारी यशवंत भांड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मारुती कोरे, विभागप्रमुख शरद चरकरी, जयवंत साळवी, उपविभागप्रमुख चेतन खंदारे, सरपंच प्रसाद माने, अंगणवाडी सेविका, आशा सेविका व इतर उपस्थित होते.

Web Title: Launch of 'My Ratnagiri, My Responsibility' campaign in Lanja taluka