रत्नागिरीत उभारणार राज्यातील सगळ्यात मोठी प्रशासकीय इमारत, मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 03:36 PM2021-12-13T15:36:40+5:302021-12-13T15:39:24+5:30

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत असावी आणि जिल्हाभरातून याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची वणवण कमी व्हावी यादृष्टीने ही इमारत बांधण्यात येणार आहे.

The largest administrative building in the state to be erected at Ratnagiri says Minister Uday Samant | रत्नागिरीत उभारणार राज्यातील सगळ्यात मोठी प्रशासकीय इमारत, मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

रत्नागिरीत उभारणार राज्यातील सगळ्यात मोठी प्रशासकीय इमारत, मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

Next

रत्नागिरी : शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात राज्यातील सर्वात मोठी ९ मजली प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. या इमारतीसाठी ४० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, अर्थसंकल्पात २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, टोकन म्हणून ही रक्कम दिल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्री उदय सामंत जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत असावी आणि जिल्हाभरातून याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची वणवण कमी व्हावी यादृष्टीने ही इमारत बांधण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जुन्या व जीर्ण झालेल्या इमारती पाडून याठिकाणी पुण्याच्या धर्तीवर १ लाख ५० हजार चौरस फुटांची ९ मजली ही इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीत ५० शासकीय कार्यालये असणार आहेत, अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली.

या इमारतीच्या सर्वात शेवटच्या मजल्यावर ६०० आसन क्षमतेचे नाट्यगृह बांधण्यात येणार आहे. तसेच एका मजल्यावर पर्यटकांसाठी दालन असेल. रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्याबाबतची सर्व माहिती याठिकाणी मिळणार आहे. पर्यटकांना येण्यासाठी या इमारतीत स्वतंत्र मार्ग असेल, तसेच दिव्यांगांसाठीही स्वतंत्र मार्ग व व्यवस्था या इमारतीत करण्यात येणार आहे, असे सामंत यांनी सांगितले. येत्या आठ दिवसात या इमारतीच्या कामाची निविदा काढण्यात येणार आहे. सद्यस्थितीत या इमारतीसाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली.

Web Title: The largest administrative building in the state to be erected at Ratnagiri says Minister Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.