मराठा आरक्षणासंदर्भात लांजात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:24 IST2021-06-02T04:24:06+5:302021-06-02T04:24:06+5:30
लांजा : मराठा आरक्षणासंदर्भात तालुक्यातील मराठा सखल समाज बांधवांची बैठक लांजा शासकीय विश्रामगृह येथे आमदार प्रसाद लाड यांच्या प्रमुख ...

मराठा आरक्षणासंदर्भात लांजात बैठक
लांजा : मराठा आरक्षणासंदर्भात तालुक्यातील मराठा सखल समाज बांधवांची बैठक लांजा शासकीय विश्रामगृह येथे आमदार प्रसाद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीखाली पार पडली.
या बैठकीला माजी आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष ॲड़. दीपक पटवर्धन यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार लाड यांनी मराठा आरक्षणाचा इतिहास, रियासतकालीन व्यवस्था, स्वातंत्र्यानंतर मराठा समाजातील बांधवांची उतरती स्थिती, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आरक्षण देता यावे, यासाठीचा कायदेशीर मार्गाने लढा याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी लांजा तालुका मराठा समाजातर्फे आमदार प्रसाद लाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मराठा समाजाचे अध्यक्ष सुभाष राणे, सचिव राजू जाधव, भाजप तालुकाध्यक्ष महेश खामकर, विजय कुरूप यांच्यासह मराठा समाजबांधव उपस्थित होते.
-----------------------
लांजा येथील मराठा समाजाच्या बैठकीत आमदार प्रसाद लाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड़.दीपक पटवर्धन, प्रमाेद जठार उपस्थित हाेते.