शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

परशुराम घाटात दरड कोसळली, दरडीखाली दोन पोकलेन अडकले; चौपदरीकरणाचे काम सुरु असतानाच घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 11:46 IST

घटनास्थळी मदतीसाठी तात्काळ अन्य यंत्रणा दाखल झाली आहे. 

चिपळूण : मुंबई-गोवामहामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम सुरु असतानाच दरड कोसळल्याची भीषण घटना मंगळवारी सकाळी 10.45 वाजता घडली. या दरडीखाली दोन पोकलेन व त्यांचे चालक अडकले आहेत. घटनास्थळी मदतीसाठी तात्काळ अन्य यंत्रणा दाखल झाली आहे. या घाटातील मध्यवर्ती ठिकाणी चौपदरीकरणा अंतर्गत डोंगर कटाई सुरु आहे. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कामी लागली आहे. रस्त्याच्या वरील बाजूस पोकलेनने खोदाई केली जात असतानाच बाजूचा डोंगराचा भाग खाली आला. त्यामध्ये दोन पोकलेन अडकले. तसेच त्याचे चालकही त्यामध्ये अडकले आहेत.त्यांना बाहेर काढण्यासाठी अन्य पोकलेन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून दरड हटवण्याचे काम सुरू आहे. तसेच अन्य यंत्रणा ही दाखल झाली आहे. या घटनेमुळे घाटात दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली आहे.याआधीही पावसाळ्यात परशुराम घाटात दरडीचा धोका निर्माण झाला होता. दरम्यान यावेळस काही दुर्घटना घटना घडल्या. त्यामध्ये पेढे येथील एका घरावर दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता. त्यांनतर चार दिवसांपूर्वीच एक भलामोठा दगड पेढे बौद्ध वाडी येथील घरावर येऊन मोठे नुकसान झाले होते.या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, ठेकेदार कंपनी व ग्रामस्थांची बैठक घेतली गेली. या बैठकीत काही ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दोन दिवसातच दरड कोसळल्याची भीषण घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गlandslidesभूस्खलनMumbaiमुंबईgoaगोवा