शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

हर्णे बंदरात पाच बोटी बुडून लाखो रुपयांची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 6:15 PM

कोकणात गेले दोन दिवस जोरदार अतिवृष्टीमुळे समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन आंजर्ले खाडीत तीन बोटी बुडाल्या तर पाजपंढरी आणि सुवर्णदुर्ग किल्ल््याजवळ दोन बोटी खडकावर आदळून फुटल्याने बोटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे१0 खलाशाना वाचविण्यात यश तीन खलाशी अजूनही बेपत्ता फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळापाजपंढरी आणि सुवर्णदुर्ग किल्ल््याजवळ दोन बोटी खडकावर आदळून फुटल्यादुरसंचार आणि इंटरनेट सेवाही ठप्प

दापोली, दि. १९ : कोकणात गेले दोन दिवस जोरदार अतिवृष्टीमुळे समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन आंजर्ले खाडीत तीन बोटी बुडाल्या तर पाजपंढरी आणि सुवर्णदुर्ग किल्ल््याजवळ दोन बोटी खडकावर आदळून फुटल्याने बोटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

या पाच बोटीतील १0 खलाशाना बाहेर काढण्यात स्थानिक मच्छिमार बांधवाना यश आले असून काही मच्छिमार किरकोळ जखमी झाले आहेत, परंतु  फुलचंद भय्या, दिपचंद भय्या आणि कैलाश जुवरकर हे तीन खलाशी सकाळपासून बेपत्ता आहेत.

हर्णे बंदरात जेटीची मागणी मच्छिमार बांधव गेली ३५ वर्षापासून मागणी करत आहेत, परंतु हर्णे बंदरातील जेटीकडे शासन दुर्लक्ष करत आहे. समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी मच्छिमार बांधवाना आपल्या बोटी आंजर्ले खाडीत किंवा सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या आडोशाला उभ्या कराव्या लागत आहेत, जेटी अभावी वादळ सदृश्य परिस्थितीत मच्छिमार बांधवाची कधी बोट बुडते तर कधी प्राणसुद्धा गमवावा लागत आहे. 

मंडणगड तालुक्यात सकाळी साडेनऊ वाजता वादळी वाºयासह झालेल्या पावसात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली असून अनेक मार्गावर झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून यामुळे भात पिकांना धोका निर्माण झाला आहे. शेतकरी राजा चिंतेत आहे.  दिवसभरात १३८ मिमी पावसाची नोंद झाली असून तालुक्यात एकूण ३४६१ मिमी पाऊस झाला आहे.

आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. वाहन चालकांनी गाड्या सावकाश चालवाव्यात. प्रत्येकाने आपली स्वत:ची काळजी घ्यावी. सुरक्षित ठिकाणी राहावे. आपत्कालीन परिस्थिती आढळून आल्यास त्वरित प्रशासनाला कळवावे असे आवाहन तहसीलदार प्रशांत पानवेकर यांनी केले आहे.

दरम्यान, मंडणगड आणि दापोली या दोन तालुक्यांना जोडणाºया मांदीवली पलावरुन भारजी नदीने पाण्याची पातळी ओलांडल्याने परिसरातील शेती पाण्याखाली आली आहे. तिडे व तळेघर या दोन गावांना जोडणाºया कुंबळे येथील कॉजवे वरुनही पाणी गेले असून सकाळपासुन वीज पुरवठाही खंडीत झाले आहे. दुरसंचार आणि इंटरनेट सेवाही ठप्प आहे.