हरयाणा येथील कबड्डी स्पर्धेसाठी कोतवाल सूरज कांबळेंची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:36 IST2021-09-15T04:36:36+5:302021-09-15T04:36:36+5:30
रत्नागिरी : केंद्र शासन व हरयाणा शासन यांच्या वतीने आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी स्पर्धा २०२०-२१ साठी रत्नागिरी ...

हरयाणा येथील कबड्डी स्पर्धेसाठी कोतवाल सूरज कांबळेंची निवड
रत्नागिरी : केंद्र शासन व हरयाणा शासन यांच्या वतीने आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी स्पर्धा २०२०-२१ साठी रत्नागिरी तालुक्यातील शिरगावचे कोतवाल सूरज श्रीराम कांबळे यांची निवड झाली आहे. येथील तहसील कार्यालयात त्यांचा सत्कार करून स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
केंद्र शासन व हरयाणा शासन यांच्या वतीने आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी स्पर्धा भिवानी हरयाणा येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी रत्नागिरी तालुक्यातील शिरगावचे कोतवाल सूरज श्रीराम कांबळे यांची निवड झाली आहे. याबद्दल रत्नागिरीच्या नायब तहसीलदार (निवडणूक विभाग) माधवी कांबळे , महसूल सहायक परिमल डोर्लेकर, जिल्हा कोतवाल संघटनेचे सचिव शेखर सावंत, तालुकाध्यक्ष विक्रांत कदम, स्वप्नील सावंत, राजेंद्र पवार यांनी तहसील कार्यालयात त्यांचा सत्कार करून या राष्ट्रीय स्पर्धेतील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
फोटो मजकूर
हरयाणा येथील अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरी तालुक्यातील शिरगावचे कोतवाल सूरज श्रीराम कांबळे यांची निवड झाली आहे. याबद्दल रत्नागिरी तहसील कार्यालयात त्यांचा सत्कार करून स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.