शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
2
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
3
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
4
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
5
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
6
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
7
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
8
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
9
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
10
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
11
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
12
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
13
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
14
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
15
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
16
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
18
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
19
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

विनातिकीट रेल्वे प्रवाशांकडून एका महिन्यात २.३३ कोटींचा दंड वसूल, कोकण रेल्वेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 16:18 IST

अकरा महिन्यांत २,९०,७८६ फुकट्या प्रवाशांवर कारवाई, १७.८३ कोटींचा दंड

रत्नागिरी : कोकण रेल्वेने तिकीट तपासणी मोहीम तीव्र केल्या आहेत आणि विनातिकीट प्रवाशांविरुद्ध कडक कारवाई केली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये, कोकण रेल्वेने १,०७० विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवल्या. यात ४२,९६५ अनधिकृत-अनियमित प्रवासी आढळले. त्यांच्याकडून भाडे आणि दंड म्हणून एकूण २.३३ कोटी रुपये वसूल करण्यात आले.सुरक्षित आणि जबाबदार प्रवासावर लक्ष केंद्रित करत, कोकण रेल्वेने आपल्या मार्गावर तिकीट तपासणी मोहिमांची वारंवारता वाढवली आहे. या प्रयत्नांचे उद्दिष्ट तिकीटविरहित प्रवासाला आळा घालणे आणि अधिकृत प्रवाशांसाठी सुरळीत, आरामदायी प्रवास सुनिश्चित करणे आहे, हे आहे.नोव्हेंबर २०२५ या महिन्यात कोकण रेल्वे प्रशासनाने धडक कारवाई केली. या महिन्यात कोकण रेल्वेने १,०७० विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवल्या. यावेळी ४२,९६५ अनधिकृत -अनियमित प्रवासी आढळले. भाडे आणि दंड म्हणून या प्रवाशांकडून एकूण २.३३ कोटी रुपये वसूल करण्यात आले.जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ पर्यंत, एकूण ७,४८३ विशेष मोहीम राबवण्यात आल्या, ज्यामध्ये २,९०,७८६ अनधिकृत/अनियमित प्रवासी आढळले. या कालावधीत देय रेल्वे भाडे आणि दंड म्हणून १७.८३ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.

तिकीट तपासणी तीव्र हाेणारप्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी वैध तिकीट खरेदी करण्याचे आवाहन काेकण रेल्वे प्रशासनाने केले आहे. योग्य तिकिटाशिवाय प्रवास करणे हा दंडनीय गुन्हा आहे. सर्व अधिकृत प्रवाशांना सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी काेकण रेल्वे हिवाळा आणि ख्रिसमसच्या सणांच्या काळात त्यांच्या संपूर्ण मार्गावर तिकीट तपासणी मोहीम तीव्र करणार आहे, असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Konkan Railway Collects ₹2.33 Crore Fine From Ticketless Travelers

Web Summary : Konkan Railway collected ₹2.33 crore in fines from 42,965 unauthorized passengers in November 2025. Intensive ticket checking drives are ongoing to ensure safe and comfortable travel for authorized passengers. Further checks will be intensified during the Christmas season.