अडीच तासांनी धावली कोकण कन्या, इंजिन बिघडल्याने प्रवाशांचा झाला खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2022 13:33 IST2022-05-15T13:33:14+5:302022-05-15T13:33:42+5:30
रविवारी सकाळी कोकणकन्या एक्स्प्रेसचे इंजिन विलवडे रेल्वे स्थानकादरम्यान बिघडले.

अडीच तासांनी धावली कोकण कन्या, इंजिन बिघडल्याने प्रवाशांचा झाला खोळंबा
रत्नागिरी : मुंबई -मडगांव कोकणकन्या एक्स्प्रेसचे इंजिन बिघडल्याने सुमारे अडीच तास गाडी थांबवून ठेवण्यात आली होती. इंजिनच्या बिघाडामुळे विलवडेपासूनचा पुढील प्रवास विद्युत लोकोसह केला. कोकणकन्या एक्स्प्रेस रत्नागिरीपासून पुढील प्रवासाला निघाली असता रविवारी विलवडे दरम्यान या गाडीच्या डिझेल इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते. पुढील प्रवासासाठी विद्युत लोको (WAG9 -33322) जोडावे लागले.
रविवारी सकाळी कोकणकन्या एक्स्प्रेसचे इंजिन विलवडे रेल्वे स्थानकादरम्यान बिघडले. या नंतर याच वेळी या मार्गांवरून धावणाऱ्या मालगाडीचे इलेक्ट्रिक इंजिन काढून ते कोकणकन्या एक्स्प्रेसला जोडून गाडी मडगावच्या दिशेने रवाना झाली.