शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

किरीट सोमय्या शनिवारी दापोली दौऱ्यावर; शिवसेना-राष्ट्रवादी आणि भाजप आमने सामने येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 01:55 IST

राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम व शिवसेनेचे प्रभारी तालुकाप्रमुख ऋषी गुजर यांनी सोमय्या याना दापोलीतच रोखून धरणार असल्याचा ईशारा दिला आहे. 

दापोली - किरीट सोमय्या २६ मार्चला म्हणजेच शनिवारी दापोली दौऱ्यावर येत आहेत. अनिल परब यांचे दापोली तालुक्यातील मुरूड येथे रिसॉर्ट असल्याचा आरोप करत, हे अवैध रिसॉर्ट तोडुया, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. तर, राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम व शिवसेनेचे प्रभारी तालुकाप्रमुख ऋषी गुजर यांनी सोमय्या याना दापोलीतच रोखून धरणार असल्याचा ईशारा दिला आहे. 

किरीट सोमय्या यांनी, मिलींद नार्वेकर यांचा बंगला तुटला, आता अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडूया, असा इशारा देत, चलो दापोली, असे ट्विट केले आहे. 

किरीट सोमय्या यांच्यामुळे कोकणातील दापोली मुरूड येथील पर्यटन उद्योजकांना नोटिसा आल्या आहेत. जर कोकणातील पर्यटन उद्योगाच्या आड कुणी येणार असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा संजय कदम यांनी दिला आहे. याच बरोबर, दापोली शहरातच सोमय्या यांना वापस चले जाव, असे म्हणत रोखण्याचा इशाराही त्यांनी बुधवारी नगरपंचायत येथे पत्रकार परिषदेत दिला. या इशाऱ्यानंतर आता शनिवारी दापोलीतील शिवसेना-राष्ट्रवादी विरुद्ध भाजप आमने सामने येण्याची शक्यता आहे. यामुळेच आता सोमय्या यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.  

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याAnil Parabअनिल परबBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस