शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Kirit Somaiya: ‘बेचेनवाला-खरीदनेवाला शिवसेना’, किरीट साेमय्यांच्या नव्या ट्विटमुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 13:52 IST

‘दापाेलीची कमाई बेचनेवाला शिवसेना, खरीदनेवाला शिवसेना’ असे म्हणत शिवसेनेचे नेते व मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांना दापोलीचे शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी जमीन विकल्याचा आराेप किरीट साेमय्या यांनी या ट्विटमध्ये केला आहे.

रत्नागिरी : दापाेली तालुक्यातील मुरुड येथील राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसाॅर्ट ताेडण्यासाठी आलेल्या भाजप नेते किरीट साेमय्या यांच्या नव्या ट्विटमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. किरीट साेमय्या यांनी ‘बेचेनवाला शिवसेना, खरीदनेवाला शिवसेना’ असे म्हणत शिवसेनेचे दापाेलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावर निशाणा साधला आहे. एका जमीन व्यवहाराची चाैकशी करण्याची मागणी किरीट साेमय्या यांनी केली आहे.मुरुड येथील रिसाॅर्ट अनधिकृत असल्याचा आराेप भाजप नेते किरीट साेमय्या यांनी केला आहे. हे रिसाॅर्ट अद्याप पाडण्यात न आल्याने २६ मार्च राेजी किरीट साेमय्या चक्क प्रतिकात्मक हाताेडा घेऊन दापाेलीत आले हाेते. मात्र, पाेलिसांनी अटकाव केल्याने त्यांना रिसाॅर्टपर्यंत पाेहाेचता आले नाही. रात्री उशिराने किरीट साेमय्या यांना जिल्ह्याबाहेर नेत मुंबईच्या दिशेने पाठविण्यात आले.त्यानंतर लगेच किरीट साेमय्या यांनी रविवारी आणखी एक ट्विट करुन शिवसेनेच्या माजी आमदारावर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सूर्यकांत दळवी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. ‘दापाेलीची कमाई बेचनेवाला शिवसेना, खरीदनेवाला शिवसेना’ असे म्हणत शिवसेनेचे नेते व मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांना दापोलीचे शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी जमीन विकल्याचा आराेप किरीट साेमय्या यांनी या ट्विटमध्ये केला आहे. त्याचा सातबाराही त्यांनी जोडला आहे.ही जमीन ६२,३०० स्क्वेअर फूट इतकी आहे. एनए व्यावसायिक असणारी ही जमीम १० कोटी पेक्षा जास्त बाजार मूल्याने विकत घेतल्याचे किरीट साेमय्या यांनी म्हटले आहे. एवढेच नव्हे तर बँक ऑफ इंडियाने या जमिनीवर ४.१२ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते, असाही उल्लेख किरीट साेमय्या यांनी केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdapodiदापोडीKirit Somaiyaकिरीट सोमय्याShiv SenaशिवसेनाTwitterट्विटर