शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri- फासकीत अडकून बिबटयाचा मृत्यू, गुरख्यांनी परस्पर लावली विल्हेवाट; तब्बल पंधरा दिवसांनी उघडकीस आला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 12:26 IST

वनविभागाने दोघा गुरख्यांना घेतले ताब्यात

विनोद पवार

राजापूर : तालुक्यातील खरवते गावात आंबा बागेत लावलेल्या फासकीत अडकून मृत्युमुखी पडलेल्या बिबटयाची बागेत काम करणाऱ्या दोन गुरख्यांनी खड्डयात पुरून परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार पुढे आला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली. वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत या प्रकाराची चौकशी सुरू केली असून दोघा गुरख्यांना ताब्यात घेतले आहे. खरवते हेदाडवाडी येथे हा प्रकार घडला असून सुमारे 15 दिवसापुर्वी या बिबटयाचा मृत्यु झालेला असावा अशी माहिती रत्नागिरीचे परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांनी दिली.राजेश पुरण चौधरी व जगतराम चौधरी (रा. तिकापूर जि. कैलाली (नेपाळ) या दोघा गुरख्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर वन्य जीव संरक्षण कायदा 1972  चे कलम 9, 39, 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे बागांमध्ये फासक्या लावून वन्य प्राण्यांचे जीव घेण्याचे प्रकार निंदनिय असल्याच्या संतप्त प्रतिक्रीया तालुक्यात उमटत असून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.याबाबत माहिती अशी की, मौजे खरवते येथे नितीन व सुनील पद्माकर कुलकर्णी यांच्या मालकी गट नंबर १६/ आंबा बाग तुषार व तुळशीदास तात्या सोरप यांना करार तत्वावर दिली आहे. सोरप यांनी बाग राखणीकरता राजेश चौधरी व जगतराम चौधरी यांना ठेवले होते. बागेत साधारण पंधरा दिवसापूर्वी फासकिमध्ये अडकुन बिबट्या मृत झाला होता. कामगार राजेश चौधरी व जगतराम चौधरी यांनी या मृत बिबट्यास खड्डा काढून पुरले व त्याची परस्पर विल्हेवाट लावली. याबाबत राजापूरचे वनपाल सदानंद घाडगे यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता ही घटना उघडकीस आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी खड्डातून मृत बिबट्याला बाहेर काढून अवशेष ताब्यात घेत पशुसंवर्धन अधिकारी लांजा यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याची तपासणी करुन ताब्यात घेतले. 15 दिवस उलटून गेल्याने तो पुर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी कामगार राजेश चौधरी व जगतराम चौधरी या दोघा गुरख्यांना वन्य जीव संरक्षण कायदा 1972  चे कलम 9, 39, 51 अन्वये गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले.विभागीय वनाधिकारी दिपक खाडे  व सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, राजापूरचे वनपाल सदानंद घाडगे, वनरक्षक सुरज तेली, खरवते पोलिस पाटील सचिन सिताराम मांडवकर यांनी केली. पुढील तपास वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार करीत आहेत. अशा प्रकारे वन्यजीव अडचणीमध्ये सापडल्यास वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क करणे बाबत आवाहन वन विभागा मार्फत करण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीleopardबिबट्याforest departmentवनविभागCrime Newsगुन्हेगारी