मुलीचा पाठलाग करणाऱ्यास बदडल

By Admin | Updated: February 15, 2015 23:40 IST2015-02-15T22:18:34+5:302015-02-15T23:40:02+5:30

अलोरेतील घटना : कुटुंबियांनाही धक्काबुक्की, सामानाची मोडतोडे

The kidnapper's kidnapper | मुलीचा पाठलाग करणाऱ्यास बदडल

मुलीचा पाठलाग करणाऱ्यास बदडल

शिरगाव : आपल्या वडीलांसोबत शाळेतून घरी जाणाऱ्या मुलीकडे मोबाईल नंबर मागितला असता न दिल्याचे रागातून मोटर सायकलने पाठलाग करत जवळ जावून छेड काढल्याचा प्रकार काही युवकांनी केल्याची चर्चा समजताच, अलोरे वरची वाडी येथील तरुणांनी मोहल्ल्यात एकत्र जाऊन एका घरातील कुटुंबियांना धक्काबुुक्की केली, सामानाची मोडतोड व गाडीचे नुकसान करत ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार दि. १४ रोजी सायंकाळी ७. ३० वाजता घडला.दरम्यान, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दाखल झालेल्या परस्पर विरोधी फिर्यादीवरून अलोरे मोहल्ल्यातील तिघांवर तर वरचीवाडी येथील १९ तरुणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. अलोरेतील फिर्यादीची मुलगीला गेल्या पंधरा दिवसांपासून वाटेवर छुपा पाठलाग सुरु होता. तोच प्रकार काल घडल्याने पोलिसांत तक्रार दाखल केल्याने ३५४(५)(१)२४ अन्वये गुन्हा जाबांज खलील मुल्ला (१९), मुराद उस्मान बेबल (२१), वसीम कुंभार्लीकर यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.अलोरे मोहल्ला येथील हमन अब्दुल करीम मुल्ला (८७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आपले नातू जाबांज याने गावातील मुलीची छेड काढली असा समज करुन १९ तरुणांनी पत्नी, सून व नात यांना धक्काबुक्की करुन गाडीचे नुकसान केले व ठार मारण्याची धमकी दिली. दोन्ही बाजूकडील जमाव पोलीस स्थानकात १५ रोजी सकाळपर्यंत होता. या घटनेची डीवायएसपी महादेव गावडे, पोलीस निरीक्षक संपत पाटील यांचेकडे चर्चा करत होते.
अखेर तक्रारी दाखल झाल्याने १९ तरुणांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. प्रितम आंब्रे, तुषार चव्हाण, राकेश चव्हाण, सुशांत सुर्वे, दिनेश कदम, अमोल चव्हाण, राम मोहिते, सदाशिव मोहिते, नितेश चव्हाण, मोहन साळवी, चव्हाण, योगेश चव्हाण, यशवंत कदम, मोहन सकपाळ, संतोष चव्हाण, अनंत चव्हाण, संतोष कदम, अमित चव्हाण, राजेश चव्हाण अशी त्यांची नावे आहेत.
या प्रकारामुळे अलोरेत तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, याबाबत पोलिसांनी अद्याप तरी कोणालाही अटक केलेली नाही. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. (वार्ताहर)


गाडीचेही जमावाने नुकसान केल्याची तक्रार.
परस्परविरोधी तक्रारी दाखल.
अलोरे परिसरात तणावाचे वातावरण.
१९ तरूणांविरोधात गुन्हा दाखल.
अद्याप कोणालाही अटक नाही.
फिर्यादीच्या मुलीचा पंधरा दिवसांपासून सुरू होता पाठलाग.

Web Title: The kidnapper's kidnapper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.