शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

डुगवे गावात १५ रोजी साजरा होणार खवलोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 16:44 IST

जागतिक पातळीवर खवले मांजर अत्यंत धोक्यात आहे. खवले मांजराचे गाव म्हणून ओळख असलेल्या चिपळूण तालुक्यातील डुगवे गावात खवलोत्सव साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. १५ फेब्रुवारी रोजी डुगवे येथील ग्रामदेवतेच्या मंदिरात सारे ग्रामस्थ एकत्र जमून हा उत्सव साजरा करणार आहेत. यावेळी ग्रामस्थ खवले मांजराची प्रतिकृती पालखीत घालून नाचवणार आहेत.

ठळक मुद्दे चिपळूण तालुक्यात खवले मांजराचे गाव म्हणून ओळखग्रामदेवतेच्या मंदिरात सारे ग्रामस्थ येणार एकत्र

रत्नागिरी : जागतिक पातळीवर खवले मांजर अत्यंत धोक्यात आहे. खवले मांजराचे गाव म्हणून ओळख असलेल्या चिपळूण तालुक्यातील डुगवे गावात खवलोत्सव साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. १५ फेब्रुवारी रोजी डुगवे येथील ग्रामदेवतेच्या मंदिरात सारे ग्रामस्थ एकत्र जमून हा उत्सव साजरा करणार आहेत. यावेळी ग्रामस्थ खवले मांजराची प्रतिकृती पालखीत घालून नाचवणार आहेत.जगातील अशा प्रकारचे हे पहिलेच गाव आहे जेथे खवले मांजराला देवाचे स्थान देऊन ग्रामस्थ त्याच्या संरक्षणासाठी एकवटले आहेत. सह्याद्री निसर्ग मित्र संस्था गेली ४ वर्षे कोकणात खवले मांजर संरक्षण संवर्धन प्रकल्प राबवत आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती, प्रत्यक्ष खवले मांजराचा अभ्यास, संशोधन व प्रत्यक्ष संरक्षण असे काम सुरू आहे.खवले मांजर हा निसर्ग साखळीतील एक महत्त्वाचा खवले धारी प्राणी असून, त्याचे संरक्षण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जागतिक खवले मांजर दिनाच्या दिवशी १५ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १०.३० वाजता डुगवे ग्रामस्थ ग्रामदेवता मंदिरात जमणार आहेत. यामध्ये पुरुष, महिला, विद्यार्थी या सर्वांचा समावेश असणार आहे.

खवले मांजराची प्रतिकृती जंगलातून मंदिरात आणण्यात येईल. तेथे विधीपूर्वक पूजा करण्यात येईल. परंपरेप्रमाणे खवले मांजराच्या जागतिक पातळीवर संरक्षण, संवर्धनासाठी गाऱ्हाणे, आरज घालण्यात येईल. मग मांजराला पालखीत घालून सहाणेवर गावकरी पालखी नाचवतील. नंतर पालखी ग्रामस्थांच्या घरा-घरात जाईल व तेथे लोक त्याची पूजा करतील. परत पालखी देवळात येईल, नंतर महाप्रसाद होऊन उत्सवाची सांगता होणार आहे.

 

रेड डाटा बुकप्रमाणे भारतीय खवले मांजर धोक्यात असलेला प्राणी आहे तर भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये खवले मांजराला शेडूल (क)मध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे त्याला वाघाइतके संरक्षण मिळाले आहे. अशा प्रकरचा हा पहिलाच कार्यक्रम होत आहे. त्यात सर्वांनी सहभागी होऊन खवले मांजराच्या संरक्षणासाठी एकत्र यावे.- भाऊ काटदरे, पँगोलीन तज्ज्ञ कमिटीचे सदस्य व सह्याद्री निसर्ग मित्रचे अध्यक्ष

जगात खवले मांजराच्या ८ प्रजाती आढळतात. त्यातील ४ प्रजाती आफ्रिकेत, तर ४ आशिया खंडात आढळतात. भारतात चिनी खवले मांजर व भारतीय खवले मांजर या दोन प्रजाती आढळतात. पूर्वोत्तर व हिमालयवगळता सर्वत्र भारतीय खवले मांजर आढळते. भारतीय खवले मांजर सर्व प्रकारच्या अधिवासामध्ये आढळते.

सुमारे पाच फूट लांब संपूर्ण शरीरावर खवले असलेल्या या प्राण्याला दात नसतात. पण त्याच्या सुमारे एक फूट लांबीच्या चिकट जिभेच्या सहाय्याने तो हजारोनी वाळवी, मुंग्या खातो. धोका वाटताच अंगाचे वेटोळे करतो. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवRatnagiriरत्नागिरी