खेड : नातूनगर वावेफाटा येथे एका ट्रक चालकाला तीन अज्ञात आरोपींनी लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने महामार्गावर भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना १६ जानेवारी रोजी सकाळी १०च्या सुमारास घडली.या तीन आरोपींपैकी विलास सुभाष चव्हाण (१८, पाटण) व दिनेश नाना लोटे (१८, देहू, पुणे) या दोघांना सापळा रचून खवटी गावानजीक ताब्यात घेण्यात आले असून तिसरा आरोपी फरार झाला आहे. तसेच गुन्हयात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे व जबरदस्तीने घेतलेले पाच हजार रुपये हस्तगत करण्यात यश आले आहे.विनोद रामू यादव (२८, वापी गुजरात) हे ट्रक (जीजे-१५-एक्सएक्स-४६२२) ने गुजरात येथून गोवा येथे जात असताना वावे फाटा येथे आल्यावर त्यानी ट्रक उभा केला आणि नदीवर आंघोळ करण्यासाठी निघाला.आंघोळ करुन परत आल्यानंतर ट्रकच्या केबीनमध्ये देवपूजा व सफाई करीत असताना तीन अज्ञात आरोपींनी ट्रकच्या केबीनमध्ये प्रवेश केला आणि यादव यांना माल निकालो, असे सांगून त्यांना पोटात डाव्या बाजूस चाकूने खूपसून खोल गंभीर दुखापत केली.त्याच्याकडील पाच हजार रपये काढून घेतले. तसेच दुसऱ्याने त्यांच्या खिशातील ६ हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. या तिघांनी मोटारसायकलने मुंबईच्या दिशेने पोबारा केला.
खेडनजीक ट्रकचालकाला लुटले, सापळा रचून दोघांना ताब्यात, मोटारसायकल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 18:34 IST
नातूनगर वावेफाटा येथे एका ट्रक चालकाला तीन अज्ञात आरोपींनी लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने महामार्गावर भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना १६ जानेवारी रोजी सकाळी १०च्या सुमारास घडली.
खेडनजीक ट्रकचालकाला लुटले, सापळा रचून दोघांना ताब्यात, मोटारसायकल जप्त
ठळक मुद्देखेडनजीक ट्रकचालकाला लुटले सापळा रचून दोघांना ताब्यात, मोटारसायकल जप्त