शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
9
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
10
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
11
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
12
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
13
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
14
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
15
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
16
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
17
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
18
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
19
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
20
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

Ratnagiri News: खेड पोलिसांनी जप्त केला एक लाखांचा देशी, विदेशी मद्यसाठा; दोघे ताब्यात 

By अरुण आडिवरेकर | Updated: March 14, 2023 14:39 IST

रत्नागिरी : खेड तालुक्यातील आंबडस येथे टाकलेल्या दाेन छाप्यांमध्ये देशी - विदेशी दारूचा १ लाख २४ हजार ७३० रुपयांचा ...

रत्नागिरी : खेड तालुक्यातील आंबडस येथे टाकलेल्या दाेन छाप्यांमध्ये देशी - विदेशी दारूचा १ लाख २४ हजार ७३० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई खेड पाेलिसांनी रविवारी (दि. १२)  केली असून, दाेघांना ताब्यात घेतले आहे. अमित सदानंद करंजकर (वय-३९, रा. आंबडस, ता. खेड) आणि  संतोष ज्ञानेश्वर मोरे (४८, रा. आंबडस, ता. खेड) अशी दाेघांची नावे आहेत.खेडचे प्रभारी सहायक पाेलिस निरीक्षक सुजित गडदे यांना मिळालेल्या गाेपनीय माहितीच्या आधारे पथकाने केळणे गवळवाडी-आंबडस येथे पहिली कारवाई केली. या छाप्यामध्ये, केळणे गवळवाडी-आंबडस येथील एका दुकानाच्या पाठीमागील बाजूला असणाऱ्या खोलीत एकूण १,२५० विविध देशी-विदेशी मद्याच्या बाटल्याचा साठा करून ठेवण्यात आलेला हाेता.

अमित सदानंद करंजकर याच्याकडे गैरकायदा व बिगर परवाना तसेच शासनाचे कोणतेही शुल्क न भरता हा साठा केल्याचे स्पष्ट झाले. तसेच ताे नागरिकांना वाढीव भावाने विक्री करताना सापडल्याने त्याला महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर तसेच खेड पोलिस स्थानकात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई), १८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसरी कारवाई आंबडसमधीलच खोतवाडी येथे करण्यात आली. याठिकाणी टाकलेल्या छाप्यात गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या संतोष ज्ञानेश्वर मोरे याला २,२३० रूपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर खेड पोलिस  स्थानकात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई सहायक पाेलिस निरीक्षक सुजित गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस काॅन्स्टेबल अजय कडू, रुपेश जोगी, राहुल कोरे व चालक पाेलिस हवालदार दिनेश कोटकर यांनी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी