खेड शहर भाजपतर्फे भाऊ कार्ले यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:27 IST2021-04-05T04:27:57+5:302021-04-05T04:27:57+5:30

khed-photo42 खेड शहर भाजपतर्फे भारत ज्योती कलारत्न राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊ कार्ले यांचा सत्कार करण्यात आला. लाेकमत न्यूज नेटवर्क ...

Khed city BJP felicitates Bhau Karle | खेड शहर भाजपतर्फे भाऊ कार्ले यांचा सत्कार

खेड शहर भाजपतर्फे भाऊ कार्ले यांचा सत्कार

khed-photo42

खेड शहर भाजपतर्फे भारत ज्योती कलारत्न राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊ कार्ले यांचा सत्कार करण्यात आला.

लाेकमत न्यूज नेटवर्क

खेड : शहरातील लेखक, दिग्दर्शक व हौशी कलाकार भाऊ कार्ले यांना भारत ज्योती कलारत्न राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल खेड शहर भाजपतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्ले यांना वर्षभरात शाहीर अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार, तसेच महाराष्ट्र विकास लोकसेवा अकादमी मुंबईचा गुणीजनरत्न गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. ५ राज्यांतील पुरस्कार प्राप्त ११० कलाकारांमधून ५ कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. गेल्या ४० वर्षांतील हौशी रंगभूमीवरील कार्याच्या मूल्यांकनावर हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. व्यक्तिगत एकांकिका लेखन, दिग्दर्शन, अभिनय यामध्ये २८० राज्यस्तरीय बक्षिसे मिळाली आहेत.

याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष अनिकेत कानडे, माजी नगराध्यक्ष आबा जोशी, रोहन राठोड, प्रवीण चव्हाण, दिगंबर आपटे, भैया पाटणे, मंदार आपटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Khed city BJP felicitates Bhau Karle