शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

यंदाही खेड तालुक्यातच खवटी-धनगरवाडीत धावला पाण्याचा पहिला टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 3:58 PM

water shortage Chiplun Ratnagiri- रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत असतानाच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. जिल्ह्यात पहिला पाण्याचा टँकर खेड तालुक्यातील खालची धनगरवाडी येथे धावला आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी जिल्हा प्रशासनाचा पहिला टँकर खेड तालुक्यातच धावला आहे.

ठळक मुद्देपाऊस आणि बंधाऱ्याच्या कामांमुळे १८ दिवस उशिराने टँकरची गरजटँकरची मागणी करणाऱ्या गावांच्या संख्येत होत आहे वाढ

रत्नागिरी : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत असतानाच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. जिल्ह्यात पहिला पाण्याचा टँकर खेड तालुक्यातील खालची धनगरवाडी येथे धावला आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी जिल्हा प्रशासनाचा पहिला टँकर खेड तालुक्यातच धावला आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये डोंगरकपारीत वसलेल्या धनगरवाड्यांमध्ये दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे धनगर वस्त्यांतील जनतेला कळशीभर पाण्यासाठी कित्येक मैल डोंगर-दऱ्यातून पायपीट करावी लागते. येथील लोकांना तर सोडाच, जनावरांनाही पाणी मिळत नसल्याने ती तडफडू लागली आहेत.

फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला होता. तसेच यंदा डिसेंबर महिन्यापर्यंत उशिरा पाऊस सुरू होता. जिल्ह्यात दरवर्षी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडूनही खडकाळ जमिनीमुळे येथे भीषण पाणीटंचाई उद्भवत आहे़. त्यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे़. मात्र, त्याकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे़.गतवर्षी चिपळूण तालुक्यातील तिवरे गावठाण नवीन वसाहतीमध्ये दि. १२ फेबुवारी २०२० रोजी पहिला टँकर धावला होता. यंदा खेड तालुक्यातील खवटी गावातील खालची धनगरवाडीमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवू लागल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. खवटी खालची धनगरवाडी हे खेड तालुक्याचे शेवटचे टोक असून रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुक्याला लागूनच हे गाव डोंगरात वसलेले आहे. त्यामुळे येथे दरवर्षी भीषण पाणीटंचाई उद्भवते. उशिरापर्यंत पडलेला पाऊस आणि बंधारे यामुळे यंदा गतवर्षीपेक्षा १८ दिवस उशिरा खवटी खालची धनगरवाडी येथे पहिला टँकर प्रशासनाकडून धावला.१६ कोटींचा आराखडाटंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यात ६८ गावांतील १५३ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यंदा १६ कोटी ४३ लाख ३४ हजार रुपयांच्या आराखड्याला शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार शासनाने जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.दूषित पाण्याचा त्रासरत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स्वरूपानंदनगर येथील २४ विहिरी दूषित पाण्यामुळे दूषित झाल्या होत्या. या दूषित पाण्यामुळे लोकांचे हाल झाले आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून शिरगाव ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार पाणी पुरवठा करण्यात आला आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरी